gold
gold esakal
अर्थविश्व

SGB : मोदी सरकारकडून स्वस्तात सोनेखरेदीची संधी!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सध्या सणासुदीचा (festive season) काळ सुरू आहे. याकाळात सोनेखरेदीकडे (Buying Gold) नागरिकांचा कल अधिक वाढतो. पण अशातच मोदी सरकार (modi government) तुम्हाला स्वस्तात सोनंखरेदीची संधी लवकरच उपलब्ध करून देणार आहे. सरकारच्या योजनेनुसार गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. मोदी सरकारची ही स्किम (gold scheme) कोणती...जाणून घ्या अधिक...

मोदी सरकार तुम्हाला स्वस्तात सोनंखरेदीची संधी लवकरच उपलब्ध करून देणार आहे. हो हे खरं आहे. कारण बदलत्या काळानुसार सोनं खरेदी करण्याची पद्धतही बदलत आहे. तुम्ही आता फिजिकल गोल्डपेक्षा डिजिटल गोल्डमध्ये सहज गुंतवणूक करू शकता. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची सातवी सीरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series-VII) सुरू होत आहे. ही योजना फक्त पाच दिवसांसाठी (25 ते 29 ऑक्टोबर) खुली असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केला जातो. 25 ऑक्टोबर 2021 पासून ही स्किम लागू करण्यात येत आहे

प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळणार

हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन खरेदी केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज 1 ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात.

कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभाजित परिवार (HUF), ट्रस्ट, विद्यापीठ आणि धर्मसंस्था बाँडच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तुम्ही सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून याची खरेदी करू शकता.

अर्थ मंत्रालयाच्या मते, 2021-22 गोल्ड बाँड्सच्या सीरिजअंतर्गत, ऑक्टोबर 2021 आणि मार्च 2022 दरम्यान चार टप्प्यांत बाँड जारी केले जातील. या सीरिडअंतर्गत मे 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत सहा टप्प्यांत बॉण्ड जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की 2021-22 सीरिज- VII साठी सबस्क्रिप्शन कालावधी 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत असेल आणि 2 नोव्हेंबर रोजी बाँड जारी केले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT