सरत्या वर्षात छोट्या शेअर्सने केला गुंवतणूकदारांना मालामाल! Sakal
अर्थविश्व

सरत्या वर्षात छोट्या शेअर्सने केला गुंवतणूकदारांना मालामाल!

सरत्या वर्षात छोट्या शेअर्सने केला गुंवतणूकदारांना मालामाल! जाणून घ्या नववर्षातील वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

या वर्षी (2021) छोट्या कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना शेअर बाजारात श्रीमंत केले.

या वर्षी (2021) छोट्या कंपन्यांच्या शेअर्सने (Shares) गुंतवणूकदारांना शेअर बाजारात (Stock Market) श्रीमंत केले. शेअर बाजारातील मजबूत तेजीमुळे छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना (Investor) यावर्षी 60 टक्‍क्‍यांपर्यंत परतावा मिळाला आहे. छोट्या शेअर्सची ही कामगिरी नवीन वर्षातही कायम राहील, असा विश्वास आहे. (Investors became rich because small shares made big profits)

स्मॉलकॅप निर्देशांकात (Smallcap Index) विक्रमी वाढ

या वर्षी डिसेंबरपर्यंत मिडकॅप (Midcap) निर्देशांक 6,712.46 अंकांनी किंवा 37.41 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. दुसरीकडे, स्मॉलकॅप 10,824.78 अंकांनी किंवा 59.81 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. त्या तुलनेत बीएसई सेन्सेक्‍स (BSE Sensex) 10,146.15 अंकांनी किंवा 21.24 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. या वर्षी 19 ऑक्‍टोबर रोजी मिडकॅप इंडेक्‍सने 27,246.34 अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठला. स्मॉलकॅपनेही त्याच दिवशी 30,416.82 अंकांची विक्रमी पातळी गाठली.

मिळाला 200 टक्‍क्‍यांपर्यंत नफाही

या वर्षी 58 कंपन्यांनी त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगद्वारे (IPO) विक्रमी 1,18,704 कोटी रुपये उभे केले. IPO उभारलेला आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 4.5 पट जास्त आहे. यापैकी 39 कंपन्यांच्या आयपीओने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला. काही कंपन्यांनी स्टॉकमध्ये 200 टक्‍क्‍यांहून अधिक नफाही दिला.

सेन्सेक्‍समध्ये चढ-उतार

जानेवारी 2021 मध्ये बीएसईच्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्‍सने 50,000 अंकांची ऐतिहासिक पातळी गाठली होती. ऑक्‍टोबरमध्ये तो 61,000 चा टप्पा गाठला. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्‍स 19 ऑक्‍टोबर रोजी 62,245.43 चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. 2020 च्या सुरुवातीला, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे शेअर बाजारांवरही वाईट परिणाम झाला होता, परंतु नंतर बाजारांनी चांगली कामगिरी केली आहे.

आर्थिक सुधारणांचा प्रभाव

दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) उद्योगातील नियामक बदलांच्या घोषणेमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांना 2018 च्या सुरुवातीपासून मार्च 2020 पर्यंत कठीण काळ होता, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतर आर्थिक सुधारणांच्या घोषणांमुळे अनेक छोट्या कंपन्यांचे शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. याशिवाय विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विकले आहेत. त्याचवेळी, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII), उच्च संपत्ती असलेले लोक (HNIs) आणि किरकोळ गुंतवणूकदार स्मॉलकॅप्समध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack Case : महाकाल मंदिरात भस्मआरतीदरम्यान भक्ताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; WhatsApp स्टेट्सवर लिहिलं होतं, 'आयुष्य क्षणभंगुर आहे...'

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या एसटीपीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता; पाच कोटींचं विशेष अनुदान

Kolhapur Killing Mystery : कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं, वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

हसायला येत नसलं तरी खोटं हसते सई ताम्हणकर? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बद्दल स्पष्टच म्हणाली अभिनेत्री, म्हणते- सेटवर जबरदस्ती...

Latest Marathi News Live Update : पुण्यात फटाक्यामुळे तीन ठिकाणी आगीच्या घटना

SCROLL FOR NEXT