IRCTC  sakal media
अर्थविश्व

'आयआरसीटीसी'चे भांडवली बाजारमूल्य एक लाख कोटी

- कृष्ण जोशी

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरीझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आज शेअरबाजारात भांडवली बाजारमूल्याचा (Market capitalization) एक लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. असा टप्पा गाठणारी ती सार्वजनिक क्षेत्रातील (Public Sector) नववी कंपनी (Ninth Company) ठरली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजारात (National share Market) आयआरसीटीसी च्या शेअरच्या भावाने प्रथमच सहा हजार रुपयांचा टप्पा गाठून 6,396.30 रुपये असा उच्चांक नोंदविला. त्यावेळी त्याचे मार्केटकॅप एक लाखकोटी रुपयांच्यावर गेले. मात्र नंतर त्यात नफावसुली झाल्यामुळे (profit collection) बाजार बंद होताना तो शेअर 5,454.85 रुपयांवर आला. वर्षभरात या शेअरने साडेतीन पट वाढ देऊन गुंतवणुकदारांना (investors) श्रीमंत केले आहे.

आयआरसीटीसी मार्फतच भारतीय रेल्वेच्या आरक्षित तिकिटांची ऑनलाईन विक्री केली जाते. यावर्षी त्यामार्फत रेल्वेची 66 टक्के तिकिटे आरक्षित झाली. या व्यवसायात आयआरसीटीसी ची मक्तेदारी आहे. आयआरसीटीसी ने सध्या भागधारकांसाठी स्टॉक स्प्लीटची (एका शेअरचे पाच शेअर होणार) घोषणा केली असल्यानेही त्याचा भाव गगनाला भिडला. त्यासाठीची रेकॉर्ड डेट 29 ऑक्टोबर आहे. म्हणजेच त्या तारखेला ज्यांच्या नावावर आयआरसीटीसी चे शेअर असतील त्यांना प्रत्येक शेअरमागे पाच शेअर मिळतील. अर्थात त्यानंतर आयआरसीटीसी च्या शेअरची किंमतही पाचपटीने कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT