Janani Suraksha Yojana google
अर्थविश्व

Janani Suraksha Yojana : गरोदर मातांना सरकार करणार मदत; मिळणार एवढे पैसे

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ दिला जातो.

नमिता धुरी

मुंबई : भारत सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक उत्तम योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे जननी सुरक्षा योजना, जी देशातील गर्भवती महिलांसाठी चालवली जाते.

सरकारची ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत चालवण्यात येत आहे. तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया, ती गर्भवती महिलांसाठी कशी फायदेशीर आहे आणि ती कशी लागू करता येईल.

जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana)

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना सुरू करण्यामागील सरकारचा मुख्य उद्देश गरीब गर्भवती महिलांमध्ये सुरक्षित प्रसूतीला प्रोत्साहन देणे आणि याच्या मदतीने महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे. (Pregnant Women)

महिलांना ३४०० रुपयांची आर्थिक मदत

सरकार या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना ३४०० रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. पण ही रक्कम दोन प्रकारांत विभागली आहे. जे खालील प्रमाणे आहेत-

या योजनेंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या गरोदर महिलांना 1400 रुपये तसेच आशा सहाय्यकांना 300 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय महिलांना स्वत:ची चांगली काळजी घेण्यासाठी 300 रुपये अधिक दिले जातात. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना एकूण दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.

दुसरीकडे, शहरी भागात राहणाऱ्या गरोदर महिलांना 1,000 रुपये आणि आशा सहाय्यकासाठी 200 रुपये आर्थिक मदत दिली जाते, याशिवाय 200 रुपये काळजीसाठी देखील दिले जातात.

नियोजनासाठी आवश्यक गोष्टी

  • जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्याही शासकीय रुग्णालयात किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात प्रसूती करावी लागेल.

  • याशिवाय महिलांचे बँक खाते असणेही आवश्यक आहे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे हेही लक्षात ठेवा.

  • हे लक्षात ठेवले पाहिजे की या योजनेचा लाभ फक्त 2 मुलांपर्यंत उपलब्ध आहे.

जननी सुरक्षा योजनेत अर्ज कसा करावा

सरकारच्या या योजनेत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला जननी सुरक्षा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला https://pmmodiyojana.in/ भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT