JM Financial Services sakal
अर्थविश्व

जे. एम. फायनान्शिअल्सच्या नफ्यात वर्षभरात सुमारे 20 टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जे. एम. फायनान्शिअल्स या वित्तसेवा विषयक कंपनीने नुकत्याच संपलेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 216 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला असून तो मागीलवर्षाच्या याच तिमाहीपेक्षा सुमारे वीस टक्के जास्त आहे. याच कालावधीतील त्यांचे उत्पन्नही 964 कोटी रुपयांवर गेले आहे.

कंपनीने नुकतेच या तिमाहीचे तसेच डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांचे लेखापरिक्षण न केलेले आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने आपल्या एक रुपया दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागावर पन्नास पैसे इतका लाभांशही जाहीर केला आहे. गेल्या नऊ महिन्यांमधील त्यांचे प्रति समभाग उत्पन्न 6.23 रु. आहे.

कंपनीला पूर्वीच्या वर्षातील या तिमाहीत 890 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. तर त्या तिमाहीत त्यांना 180 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीला 2,385 कोटी रुपये उत्पन्न मिळाले, वर्षभराने त्यात 22 टक्के वाढ होऊन ते 2,926 कोटी रुपये झाले. तर डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांमध्ये त्यांना 594 कोटी रुपये निव्वळ नफा झाला. त्याआधीच्या वर्षातील याच नऊ महिन्यांमध्ये त्यांना 413 कोटी रुपये निव्वळ नफा झाला. ही वर्षिक वाढ 43 टक्क्यांहूनही जास्त होती.

कंपनीने दिलेली एकूण कर्जे 11,240 कोटी रुपयांवर गेली असून नेट एनपीए 2.76 टक्के आहे. कंपनीच्या कामगिरीबद्दल बिगर कार्यकारी उपाध्यक्ष विशाल कंपानी यांनी समाधान व्यक्त केले असून या नऊ महिन्यांमधील 594 कोटी रुपये निव्वळ नफा हा आर्थिक वर्ष 2020-21 मधील बारा महिन्यांच्या 590 कोटी रुपये नफ्याहूनही जास्त असल्याची मोठीच कामगिरी आहे, असेही ते म्हणाले. सामान्य कर्जदारांसाठीचा तारण कर्जाचा व्यवसायही वाढत असून प्रत्येक तिमाहीत दीडशे कोटी रुपये कर्ज दिले जाते. ग्राहकांना सुलभतेने व्यवहार करता यावेत यासाठी आम्ही डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

SCROLL FOR NEXT