LIC Share Price
LIC Share Price esakal
अर्थविश्व

महत्त्वाची बातमी! ब्रोकरेज हाऊसनं LIC चे शेअर्स खरेदी करण्याचा दिला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

एलआयसीचा शेअर दर एका महिन्यातच आयपीओ किंमतीच्या तुलनेत 31 टक्क्यांनी घसरलाय.

LIC Share Price : एलआयसीचा (LIC Shares Price) 21 हजार कोटी रुपयांचा आयपीओ 17 मे रोजी शेअर बाजारात (Stock Market News) लीस्टेड झाला होता. 6.5 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या एलआयसी शेअर्सची (LIC Shares) एक महिन्यात 32 टक्के इतकी घसरण झाली. शुक्रवारी सकाळीसुद्धा एलआयसीच्या शेअर्समध्ये 2 टक्के घसरण होऊन शेअर्स नव्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

एलआयसीच्या शेअर्सच्या विक्रीवेळी मोठ्या संस्थांनी जास्त प्रमाणात शेअर्स घेतले होते. २१ हजार कोटी रुपयांच्या आयपीओपैकी ५ हजार ६२७ कोटी रुपयांचे शेअर्स संस्थांनी खरेदी केले होते. नॉर्वेजियन वेल्थ फंड नॉर्जेस बँक इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि सिंगापूर सरकार हे अँकर बुकचे सदस्य होते. याशिवाय, एचडीएफसी म्युच्युअल फंड, एसबीआय, आयसीआयसीआय, कोटक यासाराख्या मोठ्या संस्थांकडून एलआयसी आयपीओ खरेदी केला होता.

मात्र, आता शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचा शेअर दर एका महिन्यातच आयपीओ किंमतीच्या तुलनेत 31 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या एलआयसीचा शेअर 658 रुपयांवर व्यवहार करत होता. सोमवारी, एलआयसी शेअरसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. परदेशी दिग्गज ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गननं एलआयसी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. हा शेअर सध्याच्या किंमतीहून 29 टक्के अधिक परतावा देऊ शकतो. जेपी मॉर्गननं (JP Morgan) एलआयसी शेअरबाबत म्हटलंय, एलआयसी शेअर किंमतीबाबत चुकीचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. एलआयसीच्या शेअर दरात जेवढी घसरण येणं अपेक्षित होतं, तेवढी घसरण झालीय.

जेपी मॉर्गनं एलआयसी शेअर कव्हरेजला ओव्हरवेट असा शेरा दिलाय. मार्च 2023 पर्यंत एलआयसीच्या या शेअरची किंमत 840 रुपये होण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्या असलेल्या एलआयसी शेअर किंमतीपेक्षा 29 पट अधिक रिटर्न या पातळीवरून दिलं जाऊ शकतात. जेपी मॉर्गन या ब्रोकरेज संस्थेच्या या नव्या अहवालानंतर एलआयसी गुंतवणूकदार आणि पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळालाय. एलआयसीच्या शेअर दरात घसरण सुरू असल्यानं गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. एलआयसीचा आयपीओ 949 रुपये प्रति शेअर इतका झाला होता. सध्या शेअर 658 रुपयांवर व्यवहार करत आहे. एलआयसीच्या शेअर दरात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळं कंपनीचे बाजार भांडवल देखील घसरलं आहे. सध्या एलआयसीचे बाजार भांडवल 4.16 लाख कोटी रुपये इतकं झालं आहे. दरम्यान, विक्रीच्या दबावामुळं एलआयसीच्या बाजार भांडवलात 1.64 लाख कोटींची घट झालीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT