Know How to Activate Internet Banking for Your Post Office  esakal
अर्थविश्व

घर बसल्या पोस्टाचे काम करा, जाणून घ्या इंटरनेट बँकिंग सुविधा

सकाळ डिजिटल टीम

देशामध्ये आज एक मोठा वर्ग आहे जो पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो किंवा आपली जमवलेले पैसे तेथे सुरक्षित राहतीस असा विश्वास असतो. याचे मोठे कारण हे आहे की, बँक बुडायला लागते तेव्हा जमा पैशांपैकी केवळ ५ लाख पर्यंत बँकेद्वारा देण्याचा नियम आहे. पण पोस्ट ऑफिसमध्ये असे होत नाही. येथे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पूर्ण पैसे काढू शकता. अशा वेळी तुमच्या पैशांना सरकारमार्फत सुरक्षेची हमी मिळते.

काळानुरूप बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. एक काळ असा होता की छोट्या छोट्या कामांसाठी बँकेत धाव घ्यावी लागायची. पण, आता आपण आपली सर्व कामे अगदी सहज घरी बसून करू शकतो. बँकांमध्ये आता लांबच्या रांगेत काम करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा देखील सुरू केली आहे. तुमचेही पोस्ट ऑफिसमध्ये खाते असल्यास किंवा तुम्ही पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे एकल, संयुक्त आणि वैध बचत खाते असणे आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिस खात्यात नेट बँकिंग कसे अॅक्टिव्ह करायचे ते जाणून घ्या(Know How to Activate Internet Banking for Your Post Office)

  • पोस्ट ऑफिस खात्यात नेट बँकिंग अॅक्टिव्ह करणे खूप सोपे आहे.

  • तुम्हाला नेट बँकिंग सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम तुमचे खाते असलेल्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

  • नंतर तेथे नेट बँकिंग मिळविण्यासाठी एक अर्ज भरा. येथे तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, पोस्ट ऑफिस अकाउंट पासबुक इत्यादी सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.

  • यानंतर, जेव्हा ही प्रक्रिया पुढे नेली जाईल, तेव्हा पोस्ट ऑफिसद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक लिंक पाठवली जाईल.

  • या लिंकवर क्लिक करून तुम्हाला नवीन पर्याय निवडावा लागेल.

  • नंतर येथे तुम्हाला Login पर्याय निवडावा लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला नेट बँकिंग पासवर्ड आणि इतर ट्रान्झॅक्शन पासवर्डसारखी महत्त्वाची माहिती सेट करावी लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला पासवर्डही टाकावा आणि तुम्हाला नेट बँकिंग सुरू करण्यासाठी परवानगी मागितली जाईल.

  • त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी काही सामान्य प्रश्न विचारले जातील, ज्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल. विशेष म्हणजे हे प्रश्न सुरक्षेच्या कारणास्तव विचारले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

SCROLL FOR NEXT