LIC Agent  sakal
अर्थविश्व

LIC Agent : स्मशानभूमीत बसून LIC एजंटची कोट्यावधींची कमाई

LIC च्या माध्यमातून मिळणाऱ्या कमिशनमुळे काही एजंट करोडपतीही झाले आहेत

सकाळ डिजिटल टीम

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही विमा पॉलिसी देणारी संस्था आहे. LIC ही सरकारी संस्था असल्यामुळे या संस्थेवर लोकांचा विश्वास आहे. एलआयसी लोकांचा विमा काढण्यासाठी एका एजंट्सची नेमणूक करते. या एजंटना LIC द्वारे प्रत्येक विमा पॉलिसीवर कमिशन दिले जाते. एलआयसीच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमिशनमुळे काही एजंट करोडपतीही झाले आहेत. यापैकी एक नाव म्हणजे भरत पारेख. भरत पारेख हे एलआयसीचे एजंट असून त्यांची कमाई करोडोंमध्ये आहे.

भरत पारेख हे अनेक दशकांपासून एलआयसीशी जोडले गेले आहेत. सुरुवातीच्या काळात भरत पारेख वर्तमानपत्रात मृत्यूच्या नोटिस स्कॅन करत असत आणि विमा विकण्यासाठी स्मशानभूमीत जात. तिथे ते लोकांना आपली ओळख करून देत आणि त्यांना व्हिजिटिंग कार्ड देत. त्यासोबतच मृतांच्या कुटुंबीयांना पोलिसी क्लेम लवकर मिळवून देण्याचे आश्वासनही देत.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पारेख म्हणतात, "भारतात तुम्हाला अंत्यसंस्काराला जाण्यासाठी कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. तुम्ही मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटा आणि तुमच्याबद्दल त्यांना माहिती द्या. तुम्ही त्यांना मृत व्यक्तीच्या जीवन विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी मदत कराल असं सांगितलं आणि त्यांना व्हिजिटिंग कार्ड दिले तर ते स्वतःहून संपर्क साधतात."

55 वर्षीय पारेख हे देशातील सर्वात मोठे विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या लाखो एजंटांपैकी एक आहेत. पारेख हे एलआयसीचे स्टार एजंट आहेत. पारेख यांनी आतापर्यंत 324 दशलक्ष डॉलर किमतीचा जीवन विमा विकला आहे. यातील बहुतांश पॉलिसी नागपूर किंवा आसपासच्या आहेत. पारेख म्हणतात की, त्यांनी 40,000 पॉलिसी विकल्या आहेत. त्याच वेळी ते प्रीमियम जमा करणे, क्लेम सेटलमेंट इत्यादी सुविधा मोफत देतात.

त्याचबरोबर बदलत्या काळानुसार पारेख यांनी काम करण्याची पद्धतही बदलली आहे. त्यांच्या कामात ते तंत्रज्ञानाचा वापर करतात. पारेख 1995 पासून त्यांचे रेकॉर्ड संगणकीकृत करत आहेत. आर्थिक सेवा पुरवणाऱ्या पारेख यांच्या कार्यालयात सध्या पस्तीस लोक काम करतात.

भरत पारेख यांची कमाई एलआयसीच्या चेअरमनच्या बरोबरीची असल्याचे म्हंटले जाते. सुमारे तीन दशकांपासून, पारेख जगातील आघाडीच्या जीवन विमा आणि वित्तीय सेवा व्यावसायिकांच्या ग्रुपचे सदस्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT