Investment
Investment Sakal
अर्थविश्व

दिवाळीची तयारी झाली, पण गुंतवणुकीकडे लक्ष दिलंत का?

ओमकार वाबळे

लेखन - तेजाली चंद्रकांत शहासने

दिवाळी आली, घराची साफसफाई सुरू झाली. पण तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष दिलंत का? घराप्रमाणे गुंतवणुकीवरही वेळोवेळी हात फिरवणं आवश्यक असतं. या दिवाळीपासून सवय लावू या गुंतवणुकीवर वेळोवेळी हात फिरवण्याची.

बँक आणि क्रेडिट कार्ड

हे तुमच्या जमा-खर्चाचा आरसा असतं.लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अपरिहार्यपणे काही खर्च झाले असतील. घरून काम, बदललेली जीवनशैली यामुळे आपल्या सवयीही बदलल्या असतील. पण हे बदल दीर्घ मुदतीसाठी तुमच्या खिशाला परवडतील का हा प्रश्न स्वता:ला विचारा. परिस्थिती बदलली तरी अनेकदा सवयी तशाच राहतात. अशा अनावश्यक सवयी, खर्चाला कात्री लावा. योग्य आर्थिक शिस्त हा यशस्वी अर्थ-नियोजनाचा पाया आहे.

मुदत ठेवी

या दिवाळीच्या निमित्ताने मुदत पूर्ण झालेल्या मुदत ठेवींचं नुतनीकरण करा. त्यांचा आढावा घ्या. मुदत ठेवी अर्थात फिक्स डिपॉझिट ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. काही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असलीच पाहिजे पण ती किती हेज्याचं त्याने ठरवावं.एकूण गुंतवणूकीच्या साधारण 20 %टक्के गुंतवणूक ही मुदत ठेवीमधे असावी असा संकेत आहे. वाढत्या वयोमानाप्रमाणे याचे गुणोत्तर वाढत जाते. गेल्या काही वर्षांपासून व्याजदर घटत असून ते वाढत्या महागाईला पुरेसे पडणारे नाहीत.हे लक्षात घेता भविष्यकालीन तरतुदीसाठीसाठी फक्त त्यावरच अवलंबून राहणे शहाणपणाचे ठरणार नाही. त्यामुळे शक्य आणि आवश्यक असल्यास गुंतवणूकीचे इतर पर्यायही शोधा.

सोने, गोल्ड म्युच्यूअल फंड्स आणि सुवर्णरोखे (गोल्ड बाँड)

गेल्या काही महिन्यांमधे सोन्याच्या किमतीनेउच्चांक मोडले आहेत. 2019 ते 2021 मध्ये सोन्याचा भाव 55 हजार रूपये प्रति तोळापर्यंत जाऊन आला असला तरी आता त्याची किंमत स्थिरावत आहे. गेल्या पाच वर्षातल्या किमती बघितल्या तर आज सोने जवळ जवळ दुपटीने वाढले आहे. त्यामुळे, सातत्याने सोन्यात गुंतवणूक करत असाल तर त्याची फळं चाखण्याची वेळ आता आलेली आहे. त्यातील फायदा आता काढून घेता येईल किंवा स्थैर्याचा फायदा घेत यात अधिक गुंतवणुकीची संधीही घेता येईल.

आरोग्य विमा पॉलिसी

मोठी आजारपणं, मोठ्या शस्त्रक्रिया सामान्य माणसाला आर्थिक संकटात लोटू शकतात. आरोग्य विमा अशा परिस्थितीत उपयोगी ठरतो. मात्र यासाठी विमाकवच पुरेसे हवे.महामारीमुळे अनेकांनी अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा धसका घेतला. यातून आरोग्य विमा घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र वेळेवर हप्ता न भरल्यास पॉलिसीचा लाभ मिळताना अडचणी येतात. त्यामुळे याचे हप्ते वेळोवेळी गेलेत ना याकडे लक्ष द्या. तुमचं विमाकवचतुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी पुरेसं आहे ना हेही पाहा. इतर विम्यांचे हप्तेही लक्षात घ्या व आपल्या पगार व उत्पन्नाचे वेळापत्रक लक्षात घेऊन त्या अनुषंगाने विम्याच्या हप्त्यांचे वेळापत्रक आखा.

म्यूच्युअल फंड

या महामारीमध्ये काही सकारात्मक घडले असेल तर ते भारतीय शेअर बाजारात. अनेक म्यूच्युअल फंडांनी गेल्या वर्षभरातअतिशय उत्तम कामगिरी केली आहे. तुम्ही बरीच वर्षे म्यूच्युअल फंडमध्येगुंतवणूक करत असाल तर आता त्या गुंतवणुकीतून फायदा काढून घेण्याची वेळ आली आहे. फायदा काढून मुद्दल योग्य ठिकाणी पुन्हा गुंतवा.दीर्घकाल एका म्यूच्युअल फंडमध्ये अडकून राहिलात तर कालांतराने त्यातून मिळणारा फायदा कमी होतो.

शेअर्स

लॉकडाउनच्या काळात घरी असल्याचा फायदा घेऊन अनेकांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. पण आता सगळं पूर्ववत होत आहे.त्यामुळे कदाचित तुमच्या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष झाले असेल. गेले काही दिवस शेअर बाजारामध्ये बरीच अनिश्चितता आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीकडे एक नजर टाकून त्याचा फायदा बाजूला करून मुद्दल पुन्हा इतर ठिकाणी गुंतवणे श्रेयस्कर.

पैशाच्या बाबतीत आपत्कालीन नियोजन अतिशय महत्त्वाचं असतं.सहा महिने आपल्या प्राथमिक गरजा भागतीलएवढे पैसे गाठीशी असावेत असे म्हणतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरअनुभवलेल्या अनिश्चिततेमुळे अशा आपत्कालीन आर्थिक नियोजनाचं महत्त्व अधोरेखितहोतं. तुमच्या सर्व गुंतवणूकीचा आढावा घेऊन या गणितात तुमची गुंतवणूक कुठे बसते ते पहा आणि त्यादृष्टीने नियोजन करायला सुरुवात करा.

थोडक्यात काय, तर वर्षभरात आलेल्या गेलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब लावा. गुंतवणुकीमधे झालेल्या फायद्या-तोट्याचा अंदाज घ्या.कुठे गुंतवणूक कमी-जास्त आहे त्याची नोंद करून योग्य कार्यवाही करा. तुमच्या पैशावर तुमचा हात फिरला नाहीतर त्यातून तुम्हाला अपेक्षित फायदा मिळणार नाही. शेवटी काय, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT