कोणते शेअर्स चांगला परतावा देतील? जाणून घ्या आजची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी esakal
अर्थविश्व

आज कोणते शेअर्स चांगला परतावा देतील? जाणून घ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी

कोणते शेअर्स चांगला परतावा देतील? जाणून घ्या आजची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी

सकाळ वृत्तसेवा

मंगळवारी बाजारात अधिक अस्थिरता होती, त्यानंतर बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा वधारला गेला.

मंगळवारी बाजारात अधिक अस्थिरता होती, त्यानंतर बुधवारी शेअर बाजार (Stock Market) पुन्हा एकदा वधारला गेला. NSE निफ्टी (Nifty) 184 अंकांनी वाढून 16,955 वर बंद झाला तर BSE सेन्सेक्‍स 611 अंकांनी वधारून 56,930 वर बंद झाला. निफ्टी बॅंक 421 अंकांनी वाढून 35,000 च्या पातळीवर पोहोचला आणि अखेरीस 35,029 च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्याचा बाजार पॅटर्न मोठ्या घसरणीनंतर बाजारात पुलबॅक रॅली सुरू ठेवण्याचे संकेत देतो. (Learn today's trading strategy in the stock market)

जाणून घ्या आजची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी

एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे (HDFC Securities) तांत्रिक संशोधन विश्‍लेषक नागराज शेट्टी (Nagraj Shetty) म्हणाले, बाजारात पुलबॅक रॅली सुरूच राहील आणि निफ्टी आता 17,000 ते 17,200 पातळीच्या आसपास लक्षणीय ओव्हरहेड रेझिस्टन्सकडे वाटचाल करत आहे. अशी अधिक शक्‍यता आहे की निफ्टीत किंचित घसरण होईल. NSE निफ्टीसाठी सपोर्ट 16,830 स्तरावर ठेवण्यात आला आहे.

आजचे सुमीत बगाडियाचे डे ट्रेडिंग शेअर्स

  • नॅशनल ऍल्युमिनियम कंपनी किंवा नाल्को : CMP वर खरेदी करा, लक्ष्य रु. 106 ते रु. 110, स्टॉप लॉस रु. 99

  • मणप्पुरम फायनान्स : CMP वर खरेदी करा, लक्ष्य रु. 168 ते रु. 170, स्टॉप लॉस रु. 157

रवी सिंघलचा आजचा ट्रेडिंग स्टॉक

  • हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन किंवा एचडीएफसी : रु. 2540 किंवा त्याहून अधिक दराने विक्री करा, रु. 2500 ते रु. 2470 पर्यंत लक्ष्य ठेवा, नुकसान स्टॉप लॉस रु. 2566

  • HDFC बॅंक : रु. 1444 किंवा त्याहून अधिक किमतीला विक्री करा, लक्ष्य रु. 1400, स्टॉप लॉस रु. 1466

गुरुवारसाठी मुदित गोयल डे ट्रेडिंग स्टॉक

  • अरबिंदो फार्मा : CMP वर खरेदी करा, लक्ष्य रु. 735, स्टॉप लॉस रु. 708

  • क्रॉम्प्टन ग्रीव्ह्‌ज : CMP वर खरेदी करा, लक्ष्य रु. 429, स्टॉप लॉस रु. 409

सूचना : हे दिलेले सल्ले आणि शिफारशी वैयक्तिक विश्‍लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांच्या आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया माहिती नीट तपासा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT