LIC Share Price
LIC Share Price esakal
अर्थविश्व

LIC : एलआयसी लाभांश देणार?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एलआयसीकडून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी २२ अब्ज डॉलर्सचा लाभांश, बोनस जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. एलआयसीचा समभाग भांडवली बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मे महिन्यामध्ये शेअर बाजारात आलेल्या समभागात आतापर्यंत तब्बल ३५ टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे २.२३ ट्रिलियन रुपये नुकसान झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

कंपनीतील उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समभागात पुन्हा तेजी येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कंपनीच्या तिजोरीत असलेल्या ११.५७ ट्रिलियन रुपयांच्या विम्यांच्या मालकीवर कोणत्याही नॉमिनीने हक्क सांगितलेला नाही. यापैकी १.८ ट्रिलियन रुपये खर्च करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत एलआयसी आणि अर्थ मंत्रालयाकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. एलआयसी कंपनीच्या एका समभागाची किंमत ९४९ रुपये होती, मात्र आता त्यात मोठ्या प्रमाणात घसरण होत तो ६०० रुपयांच्या खाली आला आहे. त्यामुळे त्यामध्ये कोणताही गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास इच्छूक नाही. देशातील गुंतवणूकदारांनी समभागात गुंतवणूक करावी, यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT