LIC Policy sakal
अर्थविश्व

LIC Scheme : LIC च्या 'या' योजनेत रोज 200 रुपये गुंतवा; मिळतील 28 लाख, कसं ते घ्या जाणून

तुम्ही देखील गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी उपयुक्त ठरू शकते.

सकाळ डिजिटल टीम

LIC Jeevan Pragati Plan : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या विमा पॉलिसी घेऊन येत असते. LIC च्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

LIC ने समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विमा योजना आणली आहे. तुम्ही देखील गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी उपयुक्त ठरू शकते.

LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेमध्ये तुम्हाला सिक्युरिटीसह गुंतवणुकीचा पर्याय मिळतो, ज्यामुळे तुम्हाला मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मोठी रक्कम मिळते. यामध्ये, दररोज 200 रुपये म्हणजेच दरमहा 6,000 रुपये जमा करून, तुम्हाला मॅच्युरिटीवर रु. 28 लाखांपर्यंत मोठी रक्कम मिळू शकते. LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेअंतर्गत, तुम्हाला किमान 12 आणि 20 वर्षांची मुदत मिळते.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

काय आहे योजना?

तुम्ही LIC ची जीवन प्रगती योजना घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात आजीवन संरक्षण मिळेल. तसेच, दररोज 200 रुपये आणि एका महिन्यात 6 हजार रुपये जमा करा. म्हणजेच ते वर्षाला 72 हजार रुपये जमा होतात.

त्यानंतर या योजनेत 20 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला बोनससह 28 लाख रुपये मिळतील. विम्याची रक्कम दर 5 वर्षांनी वाढते. त्याच पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, बोनस आणि विमा रक्कम जोडून त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला दिली जाते.

किती कव्हरेज मिळेल?

या योजनेत, जर एखाद्याने 4 लाख रुपयांची विमा पॉलिसी घेतली असेल तर 5 वर्षानंतर ती 5 लाख रुपये होईल. त्यानंतर 10 ते 15 वर्षांसाठी 6 लाख रुपये आणि 20 वर्षांत ही रक्कम 7 लाख रुपये होईल.

योजनेतील महत्वाचे मुद्दे :

  • LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेअंतर्गत, तुम्हाला किमान 12 आणि 20 वर्षांची मुदत मिळते.

  • 12 ते 45 वयोगटातील लोक ही विमा योजना घेऊ शकतात.

  • या योजनेअंतर्गत, प्रीमियमची रक्कम तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर जमा केली जाऊ शकते.

  • किमान विमा रक्कम 1.5 लाख आहे आणि कमाल मर्यादा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT