Reserve Bank of India
Reserve Bank of India 
अर्थविश्व

बँक खात्याशी 'आधार' क्रमांक जोडणे अनिवार्य 

वृत्तसंस्था

मुंबई : बॅंक खात्यासोबत आधार क्रमांक जोडणे अनिवार्य नसल्याच्या वृत्ताचे आज रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) खंडन करत "प्रिवेंशन ऑफ मनी लॉंड्रिंग' या कायद्याअंतर्गत ही जोडणी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 

माहिती अधिकाराअंतर्गत दाखल एका अर्जास उत्तर देताना आरबीआयने बॅंक खात्यासोबत आधार क्रमांक जोडणे अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे, अशा स्वरूपाच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज बॅंकेकडून पत्रक काढून याबाबतचा खुलासा करण्यात आला. आपला आधार क्रमांक बॅंक खात्याशी जोडणे अनिवार्य असून, "प्रिवेंशन ऑफ मनी लॉंड्रिंग ऍक्‍टमधील दुसरी दुरुस्ती नियम-2017' नुसार ते सक्तीचे असल्याचे आरबीआयने आपल्या पत्रकात म्हटले आहे. 

जून 2017 मध्ये जारी करण्यात आलेले नियम वैधानिकदृष्ट्या मान्य करावे लागतील, तसेच बॅंकांनी पुढील आदेशाची वाट न पाहता त्याची अंमलबजावणी करावी, असेही या पत्रकात नमूद आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वीच आधार क्रमांक बॅंकेशी जोडणे अनिवार्य केले असून, त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT