P.-Chidambaram 
अर्थविश्व

नोटाबंदीने अर्थव्यवस्थेची हानी

पीटीआय

नवी दिल्ली - नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान झाले. रोजगारात घट होण्यासोबत एकूण देशांतर्गत उत्पन्नही (जीडीपी) कमी झाले, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी केली. 

नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या नोटांपैकी ९९.३ टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर चिदंबरम यांनी ट्‌विटरवर सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले आहे की, रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केवळ १३ हजार कोटी रुपयांच्या रद्द नोटा परत आलेल्या नाहीत. या नोटांसाठी देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता ‘जीडीपी’ १.५ टक्‍क्‍याने कमी झाला. यामुळे अर्थव्यवस्थेला २.२५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.  

नोटाबंदीनंतर १५.४२ लाख कोटी रुपयांपैकी केवळ १३ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेकडे परत आलेले नाहीत. माझा असा संशय आहे की, हे १३ हजार कोटी रुपये नेपाळ व भूतानमध्ये असावेत आणि काही गहाळ अथवा नष्ट झालेले असावेत, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या नोटांपैकी केवळ १३ हजार कोटी रुपयांच्या रद्द नोटा परत आल्या नाहीत. यासाठी देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) १.५ टक्‍क्‍याने कमी झाले.  
- पी. चिदंबरम, ज्येष्ठ काँग्रेस नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT