LPG Cylinder News esakal
अर्थविश्व

LPG Cylinder : आता मिस्ड काॅलवर मिळेल गॅस सिलिंडर, जाणून घ्या कसे ?

पेमेंट ही ऑनलाईन करता येईल.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी फोन करा. मग नोंदणी होईल आणि एक-दोन दिवसात तुम्हाला गॅस सिलिंडर मिळणार, या दोन दिवसात काय करायचे? तसेच मोबाईलवरुन बुकिंग होईलच हे कशा वरुन? जर तुम्ही गॅस सिलिंडर एका मिस्ड काॅलवर बुक करु शकला तर ? अहो हे शक्य आहे. इंडियन ऑईलने (Indian Oil) ही सेवा सुरु केली आहे. ही कंपनी इंडेन (Indane) या ब्रँडच्या नावाखाली एलपीजी गॅस विकते. आयओसीचे म्हणणे आहे, की ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवरुन ८४५४९५५५५५ या क्रमांकावर मिस्ड काॅल द्यावा. बस्स तुमचे गॅस सिलिंडर बुक झाला. (LPG Cylinder Book On Mobile Missed Call)

ऑनलाईन पैसे द्या

इंडेनने दिलेल्या माहितीनुसार मिस्ड काॅल देऊन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ऑनलाईन पैसे देण्यासाठी एक लिंक मिळेल. त्याबरोबरच तात्काळ बुकिंगचे सर्व विवरण असलेला एक एसएमएस प्राप्त होईल. त्यानंतर ग्राहकांना ऑनलाईन पैसे देण्याचा विकल्प असेल. त्यांची इच्छा असेल तर ते आगाऊ (अॅडव्हान्स्ड) पैसे ही भरु शकतात किंवा सिलिंडर मिळाल्यावर. ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळाल्यावर रोख पैसे देणे किंवा वेगवेगळ्या डिजिटल पद्धतीने सिलिंडरचे पैसे देण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मिस्ड काॅलवर गॅस सिलिंडर मिळविण्याची सुविधा देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

बुकिंग करणे होईल सोपे

इंडियन ऑईलचे ईडी आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडाचे प्रभारी राजकुमार दुबे म्हणतात, की गॅस सिलिंडर (LPG Cylinder) बुकिंगचा हा अभिनव प्रकार आहे. ही सुविधा ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यास मदत होईल. याने वेळेअभावी बुकिंग करणे सोपे जाईल. ग्राहकांसाठी सिलिंडर बुकिंगसाठी इतर प्रकारही उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT