4LPG_20gas_20delivery.jpg 
अर्थविश्व

गॅस सिलिंडर पुन्हा महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

नामदेव कुंभार

Gas Cylinder Price Hike : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाप बसणार आहे. इंधन दरवाढीने आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) दरांत वाढ केली आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरांत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंगडरच्या दरांत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता 15 दिवसांत पुन्हा 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. महिनाभराच्या आत घरगुती गॅस (14.2 किलो) सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. याचबरोबर 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर 75 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर 1693 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये 1,772 रुपये तर मुंबईत 1,649 रुपये झाला आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या 14.2 किलोच्या LPG सिलिंडरचा दर राजधानी दिल्लीत 884.50 रुपये झाला आहे. याआधी दिल्लीमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत 859.5 रुपये इतकी होती. आर्थिक राजधानीमध्येही गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत गॅसची किंमत 859.5 रुपये इतकी होती. आता यामध्ये 25 रुपयांनी वाढ झाली असून मुंबईत गॅस 884.5 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्येही 14 किलोच्या घरगुती गॅसची किंमत 911रुपये इतकी झाली आहे. याआधी कोलकातामध्ये गॅस सिलिंडर 886 रुपयांना मिळत होता. आता चेन्नईमध्ये 900.5 रुपयांना 14 किलोचा गॅस मिळेल.

यंदा 190.5 रुपयांनी महागला घरगुती गॅस -

मागील काही महिन्यांपासून सातत्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. एक जानेवारी 2021 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये प्रति सिलिंडर होती. 1 मार्च 2021 पर्यंत ही किंमत 819 वर पोहचली होती. एप्रिल महिन्यात त्यात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यात सिलिंडरचा भाव 810 रुपये झाला होता. तर जून महिन्यात कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नाही. ऑगस्ट महिन्यात 25 रुपयांनी आणि सप्टेंबरमध्ये 25 रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर महागला आहे. वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडर तब्बल 190.50 रुपयांनी महागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तीन दिवसांत पंतप्रधान मोदींची माफी मागा, अन्यथा.... ; संसदीय स्थायी समितीचा मार्क झुकरबर्ग यांना थेट इशारा

Jalna District Bank: जालना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी राहुल लोणीकर; व्हाईस चेअरमनपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड

Career Guide: नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे? जाणून घ्या कोर्सेस, पात्रता, NEET आणि प्रवेश प्रक्रिया!

Taloda Bribery Case: शेतीचा ३२ एम नमुना प्रमाणपत्रासाठी मागितली लाच, ५ हजार घेताना अव्वल कारकून जाळ्यात, याआधीही लाचखोरीचा गुन्हा

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT