Mahindra and Mahindra LTD Profit Rises  esakal
अर्थविश्व

महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यात 57 टक्क्यांची वाढ

महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

शिल्पा गुजर

महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

महिंद्रा अँड महिंद्राने (M&M) गुरुवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. व्यावसायिक वाहने आणि शेती उपकरणांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीत 57 टक्के वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा कंसॉलिडेटेड नफा 1987 कोटी होता, जो मागील वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2020 मध्ये 1268 कोटी झाला. (Mahindra and Mahindra LTD Profit Rises)

दुसरीकडे, मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील 21,626 कोटी रुपयांच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू 9 टक्क्यांनी वाढून 23,594 कोटी रुपये झाला आहे. स्टँडअलोन आधारावर, महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा नफा 27.5 टक्क्यांच्या वाढीसह 1,798 कोटी रुपये राहिला. त्याच वेळी, त्याच्या शेवटच्या आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, कंपनीचा नफा 1,410 कोटी रुपये होता.

कमोडिटीच्या वाढत्या किमती, सेमी-कंडक्टरच्या कमतरतेचा ऑपरेटिंग मार्जिनवर परिणाम झाला असून तो 11.9 टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कमोडिटी महागाई, सेमी-कंडक्टरची कमतरता यामुळे ऑपरेटिंग मार्जिनवर परिणाम झाला आहे जो 11.9 टक्के आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ट्रॅक्टर विभागातील महसूल तिमाही आधारावर 6.4 टक्के राहिला आहे, तर वार्षिक आधारावर तो 1.2 टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे, ट्रॅक्टर व्यवसायाच्या एबिटमध्ये तिमाही आधारावर 1.2 टक्क्यांनी घट झाली आहे, ज्यात वार्षिक 27 टक्क्यांनी घट झाली आहे.

दुसरीकडे, कंपनीच्या ऑटो व्यवसायातील महसूल तिमाही आधारावर 20.6 टक्क्यांनी वाढला आहे, तर वार्षिक आधारावर 14.9 टक्के वाढ आहे. दुसरीकडे, ऑटो व्यवसायाचा एबिट वार्षिक आधारावर 43.2 टक्क्यांनी घसरला, तर तिमाही-दर-तिमाही आधारावर तो 65.4 टक्क्यांनी वाढला. तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली. गुरूवारी दुपारी कंपनीचा शेअर 8.65 रुपये अर्थात 1.03 टक्क्यांच्या वाढीसह 849.15 रुपयांवर आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT