अर्थविश्व

Indian Air Strike: शेअर बाजारात घसरण 

वृत्तसंस्था

मुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 450 अंशांची घसरण झाली होती. आता शेअर बाजार सावरला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 217.82 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 995 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 56.50 अंशांनी घसरून 10 हजार 823 पातळीवर आहे. 

सेन्सेक्सने इंट्राडे व्यवहारात आज 35 हजार 714.16 अंशांची तर निफ्टीने 10 हजार 729 अंशांची नीचांकी पातळी गाठली आहे. आज सकाळी भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकून जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्याने दिल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईची माहिती सर्वांसमोर आली. त्यानंतर याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात देखील दिसून आले. गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने शेअर बाजारात सकाळच्या सत्रात घसरण झाली. 

सध्या मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, आयओसी आणि झी या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. तर एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि एसबीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT