Sensex-Sakal 
अर्थविश्व

शेअर बाजारात मंगलमय मंगळवार ! Sensex पहिल्यांदाच 53,500 वर

सुमित बागुल

अखेर गेल्या १२० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निफ्टीने पंधरा हजार ते सोळा हजारांचा टप्पा पार केलाय. आज निफ्टीने नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत इंट्राडेमध्ये १६ हजारांचा टप्पा पार केला. फेब्रुवारीच्या पाच तारखेला निफ्टीने १५ हजारांचा टप्पा पार केलेला. त्यानंतर तब्बल १२० ट्रेडिंग सत्रानंतर आता निफ्टीने १६ हजारांचा झेंडा फडकावला आहे.

एकीकडे आशियात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, त्यामुळे संपूर्ण आशियाई बाजारपेठांमध्ये सुस्तीचं वातावरण पाहायला मिळत होतं. अशातही भारतीय बाजारपेठेने उत्तम कामगिरी बजावत निफ्टीमध्ये १६ हजारांचा टप्पा गाठलाय. आजच्या सत्रात अधिकांश सेक्टर्समध्ये चांगली खरेदी पाहायला मिळाली. यामध्ये फार्मा आणि IT तसेच FMCG सेक्टर्स आघाडीवर होते. जागतिक बाजारपेठांमधून येणारे संकेत जरी काहीसे कमकुवत असले तरीही निफ्टीने आज १६ हजारांचा टप्पा गाठला आणि त्यावर ट्रेडिंग होताना पाहायला मिळालं.

केवळ निफ्टीतच नव्हे तर आजच्या सत्रात सेन्सेक्समध्ये देखील चांगली तेजी पाहायला मिळाली. आज सेन्सेक्सने देखील नवीन रेकॉर्ड हाय नोंदवला आहे. सेन्सेक्सने ५३ हजार ५०० चा पल्ला गाठत नवीन इंट्राडे हाय नोंदवला आहे.

काय आहेत तेजीची कारणे :

जुलै २०२१ मध्ये GST कलेक्शनचे आकडे वाढून १.१६ लाख करोडवर गेले आहेत. यानंतर अर्थव्यवस्थेमधील रिकव्हरी अधिक वेगवान होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय. एकीकडे भारतातील कोरोनाची दुसरी लाट कमी होत असताना इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये देखील चांगली रिकव्हरी पाहायला मिळू शकते. कोअर सेक्टर्स बाबत जर बोलायचं झालं तर जून महिन्यात वार्षिक आधारावर तुलना केल्यास बिझनेस ८.९ टक्के वधारला आहे. याशिवाय भारताचा एक्स्पोर्ट आकडा देखील वार्षिक आधारावर सुधारलेला पाहायला मिळतोय. ज्याचा परिणाम सध्या भारतीय बाजारावर पाहायला मिळतोय असं तज्ज्ञ सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election : ...तर एकत्र लढणार ‘महाविकास आघाडी’; काँग्रेसकडून ३२ जागा सोडण्याची शक्यता

Viral Video: विराट कोहलीचा व्हिडिओ काढण्यासाठी एका ड्रायव्हरने लढवली अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले...

Crime News : 'पीडितेने जबाब बदलला तरीही...' मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला हायकोर्टाचा मोठा झटका

Umred Crime : दुहेरी हत्याकांडाने उमरेड शहर हादरले; शेजाऱ्याकडून माय-लेकीची हत्या, परिसरात भीतीचे वातावरण

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये महाविकास आघाडीला सुरुंग; जागावाटपाच्या वादातून काँग्रेस-राष्ट्रवादी बाहेर?

SCROLL FOR NEXT