Maruti-Suzuki
Maruti-Suzuki 
अर्थविश्व

'या' चार गोष्टींमुळे मारुती सुझुकीच्या नफ्यात वाढ

पीटीआय

नवी दिल्ली - देशातील आघाडीची प्रवासी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीला तिसऱ्या तिमाहीत 1,565 कोटींचा नफा झाला आहे. खर्च कपातीचे प्रयत्न, कमी ऑपरेटिंग खर्च, कमॉडिटी किंमतीत झालेली घसरण आणि कॉर्पोरेट कर कपातीचा फायदा यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी कंपनीच्या नफ्यात 5.1 टक्क्यांची वाढ होऊन 1,564.8 कोटींचा नफा कंपनीने नोंदविला.

तिसऱ्या तिमाहीत कंपनीने एकूण 19,649 कोटी मूल्य असलेल्या वाहनांची विक्री केली. जी मागील वर्षीच्या तुलनेत 3.8 टक्क्यांनी अधिक आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत 2 टक्क्यांची वाढ नोंदवत या तिमाहीत कंपनीने एकूण 437,361 वाहनांची विक्री केली. तर देशांतर्गत वाहन विक्री देखील 2 टक्क्यांनी वाढून 413,698 वाहने विकली गेली. 

सोन्याची चकाकी पुन्हा वाढतेय; कारण... 

मारुती सुझुकी मोटारींच्या किंमतीत वाढ
मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) वाढत्या 'इनपुट' खर्चामुळे निवडक मॉडेल्सच्या किंमतीत १० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 'एंट्री लेव्हलच्या ऑल्टोच्या किंमतीत 9 हजार ते 6 हजार रुपये, एस-प्रेसोमध्ये 1,500 ते 8 हजार रुपये आणि वॅगनआर किंमतीत 1,500 ते 4 हजाररुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच कंपनीने एर्टिगा, बलेनोच्या किंमतीत देखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT