MSC Bank Sakal
अर्थविश्व

महाराष्ट्र राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बँकिंग क्षेत्र अडचणीत असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना १२ ते १६ टक्क्यांपर्यंत भरघोस वेतनवाढ दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बँकिंग क्षेत्र अडचणीत असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना १२ ते १६ टक्क्यांपर्यंत भरघोस वेतनवाढ दिली आहे.

पुणे - कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर देशातील बँकिंग क्षेत्र अडचणीत असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (Maharashtra State Cooperative Bank) मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना (Employee) १२ ते १६ टक्क्यांपर्यंत भरघोस वेतनवाढ (Pay Rise) दिली आहे. त्यामुळे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्य सहकारी बँकेत राज्यामध्ये विभागनिहाय सहा मान्यता प्राप्त कर्मचारी संघटना आहेत. या सर्वांशी समन्वय साधत बँकेने केवळ ११ महिन्यांतच ११ वा वेतन करार करण्यात यश मिळविले आहे.

राज्य बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नफ्यातील हिस्सा मान्य करत बँकेने स्वतःहून कर्मचाऱ्यांना १२ टक्के आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना १६ टक्के इतकी भरघोस वाढ दिली आहे. बॅंकेच्या ८३२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरासरी मासिक १३ हजार ५०० रुपये वेतनवाढ मिळणार आहे. त्यासाठी बँकेने एकूण वार्षिक १३.४७ कोटींचा बोजा स्वीकारला आहे.

बँकेचा ११ वा ऐतिहासिक वेतन करार बँकेच्या मुख्य सभागृहात नुकताच पार पडला. या प्रसंगी राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, विभागनिहाय सहा कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बँकेचे प्रशासक अनास्कर म्हणाले, ‘बँकेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कर्मचाऱ्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये दररोज होणारे बदल कर्मचाऱ्यांनी आत्मसात करुन स्पर्धेला तोंड दिले पाहिजे.’ अडसूळ म्हणाले, ‘या कराराचे शिल्पकार अनास्कर असून, कर्मचाऱ्यांना १२ टक्के पगारवाढ दिल्याबद्दल समाधानी आहे.’

बँकेच्या सेवेत कार्यरत असताना सामाजिक कार्य करणाऱ्या राज्यातील १३ कर्मचाऱ्यांना खास सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. बँकेने स्वतःहून वेतनात भरीव वाढ दिल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी बँकेच्या कामात संपूर्ण योगदान देतील, अशी ग्वाही कामगार संघटनांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SCROLL FOR NEXT