Medicine Price Hike  esakal
अर्थविश्व

Medicine Price Hike : पेट्रोल-डिझेलनंतर आता औषधंही महागणार

सकाळ डिजिटल टीम

जागतिक महागाई आणि रशिया-युक्रेन युद्धामुळं आपल्या देशातही महागाईचा भडका उडालाय.

Medicine Price Hike : जागतिक महागाई आणि रशिया-युक्रेन युद्धामुळं (Russia Ukraine War) आपल्या देशातही महागाई वाढू लागलीय. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) वाढत्या किमतींदरम्यान आता औषधांच्या किमतीही वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी-व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारनं शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची परवानगी दिलीय.

इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, भारताच्या Drug Pricing Authority नं शुक्रवारी औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्यास परवानगी दिलीय. एप्रिल महिन्यापासून National Pharmaceutical Pricing Authority अंतर्गत 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA), भारतातील औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणारी सरकारी नियामक संस्था कंपन्यांना घाऊक किंमत निर्देशांकावर (WPI) आधारित किंमती वाढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रं सादर करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर 1 एप्रिलपासून सर्व जीवनावश्यक औषधांच्या किमती सुमारे 2 टक्क्यांनी वाढू शकतात, असं सांगण्यात आलंय.

कोणत्या औषधांवर परिणाम?

अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये मधुमेह, कर्करोगावरील औषधे, हिपॅटायटीस, उच्च रक्तदाब, किडनी रोग इत्यादींवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अँटीरेट्रोवायरलसह 875 हून अधिक औषधांचा समावेश आहे. अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीचा भाग नसलेल्या कंपन्यांना त्यांच्या किमतीत दरवर्षी 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची परवानगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT