Merger of Zee-Sony Conditional approval of CCI mumbai sakal
अर्थविश्व

Zee-Sony Merger : झी-सोनीचे विलिनीकरण; सीसीआयची सशर्त मंजुरी

झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर नेटवर्क यांच्या विलीनीकरणाला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ने आज सशर्त परवानगी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर नेटवर्क यांच्या विलीनीकरणाला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ने आज सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या एकत्रीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे. या विलिनीकरणानंतर एकत्रित कंपनीचे बाजारात मोठे वर्चस्व निर्माण होणार आहे, त्याचा गैरवापर केला जाऊ नये, अशी मुख्य अट सीसीआयने लादली आहे. विलिनीकरणानंतर तयार झालेली एकत्रित कंपनी मक्तेदारी निर्माण करण्याच्या परिस्थितीत असल्याने ती जाहिराती आदींच्या दराबाबत आपली एकाधिकारशाही लावू शकते, अशी भीती सीसीआयला होती.कलवर मॅक्स एंटरटेनमेंट प्रा. लि. म्हणजेच पूर्वीचे सोनी पिक्चर नेटवर्क यांच्या काही उपकंपन्यांचेही विलीनीकरण यादरम्यान केले जाईल. या विलीनीकरणानंतर त्यातील काही वाहिन्या देखील बंद केल्या जातील.

विलीनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या कंपनीच्या चित्रपट विभागाचा बाजारातील वाटा पन्नास टक्के असेल असा अंदाज आहे. सध्या झी व सोनी यांच्याकडे, टीव्ही प्रेक्षकसंख्येचा विचार केला तर बाजारपेठेतील २४ टक्क्यांच्या आसपास वाटा आहे, तर जाहिरात महसुलाचा विचार केल्यास या एकत्रित कंपनीकडे बाजारपेठेचा २७ टक्के वाटा असेल. कमिशनच्या परवानगीनंतर आता इतर नियामकांच्या परवानगी मिळाल्यावर नवी एकत्रित कंपनी सुरू केली जाईल, असे सोनी तर्फे सांगण्यात आले.

या एकत्रित कंपनीचे मूल्य दहा अब्ज अमेरिकी डॉलर असेल असा अंदाज आहे. मुंबई शेअर बाजार तसेच राष्ट्रीय शेअर बाजारांनी या प्रस्तावित विलीनीकरणाला जुलै महिन्यातच परवानगी दिली आहे. तर मागील महिन्यात नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनलने झी ला आदेश देऊन त्यांच्या भागधारकांची बैठक १४ ऑक्टोबर रोजी बोलावून त्यांची मंजुरी घेण्याचा आदेश दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

SCROLL FOR NEXT