Oil 
अर्थविश्व

तेल उत्पादनात कपातीस मेक्सिकोचा नकार

पीटीआय

लंडन - कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये आर्थिक मंदी आल्याने कच्या तेलाच्या मागणीत झालेली घट आणि तेलाचे वाढलेले उत्पादन यामुळे कच्या तेलाच्या किमती कमी होत आहेत. यावर उपाय म्हणून तेल उत्पादन करणाऱ्या सर्व देशांनी मे आणि जून २०२० मध्ये तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला असून याला मेक्सिको वगळता इतर सर्व देशांनी सहमती दर्शवल्याची माहिती ‘ओपेक’ने शुक्रवारी दिली. 

या दोन महिन्यांत दरदिवशी एक कोटी बॅरेलने उत्पादन कमी करण्यात येणार आहे. पेट्रोलियम उत्पादक देशांच्या संघटनेच्या (ओपेक) शुक्रवारच्या बैठकीमध्ये तेलांच्या घटत्या किंमतीबद्दल चर्चा करण्यात आली. यात त्यांनी कच्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलैपासून हेच उत्पादन दिवसात केवळ ८० लाख बॅरेलचेच (बीपीडी) करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यांच्या या निर्णयाला मेक्सिको वगळता इतर सर्व तेल उत्पादक देशांनी मान्यता दिली आहे. मेक्सिकोने आपले तेल उत्पादन प्रतिदिन चार लाख बॅरेलवर आणावे असे इतर देशांचा म्हणणे आहे. त्याला त्यांनी नकार दिला आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणि तेलाच्या किमतीवरून सौदी - रशियामध्ये सुरू असलेल्या वादामुळे २० वर्षांत प्रथमच तेलाच्या किमतीत खूप मोठी घट झाली अहे. उत्पादनात कपात हाच त्यावरील पर्याय असल्याचे या बैठकीत सर्वांनी मान्य केले असले तरी मेक्सिकोने याला नकार देत उत्पादन प्रतिदिन एक लाख बॅरेल एवढेच कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT