mg zs ev 
अर्थविश्व

एमजीच्या इलेक्‍ट्रीक एसयूव्हीची धूम...

सकाळ वृत्तसेवा

गुडगाव (हरियाना) : एमजी मोटर्स (मॉरिस गॅरेज) या ब्रिटिश कंपनीची एका महिन्यातच 2 हजार 800 प्री बुकिंग झालेली एसयूव्ही श्रेणीतील पूर्णपणे इलेक्‍ट्रीक असलेली "एमजी झेडएस ईव्ही' ही मोटार भारतीय बाजारात अधिकृतपणे दाखल झाली.

झेडएस ईव्ही एक्‍साईट या मॉडेलची सुरवातीची किंमत 20 लाख 88 हजार असून, झेडएस ईव्ही एक्‍सक्‍लूयझीव्ह या मॉडेलची किंमत 23 लाख 58 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे 17 जानेवारीपर्यंत गाडी बुक केलेल्यांना दणदणीत एक लाख रुपयांचा डिस्काउंट कंपनीने जाहीर केला आहे. येत्या 27 जानेवारीपासून गाड्यांच्या डिलेव्हरीला सुरुवात करणार आहे. 

एमजी कंपनीच्या "हेक्‍टर' या इंटरनेट मोटारीला गेल्या वर्षी भारतीय बाजारात मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या इलेक्‍ट्रीक एसयुव्हीविषयी मोठी उत्सुकता होती. तसेच, प्री लॉंचपूर्वी एका महिन्यातच 2800 मोटारींची नोंदणी झाली होती. अखेर कंपनीने आपली इलेक्‍ट्रीक एसयूव्ही झेडएस (MG ZS EV) लॉंच केली.

या गाडीच्या किमतीविषयी बाजारात जी चर्चा होती, त्यापेक्षा कमी किमत कंपनीने जाहीर केली आहे. झेडएस ईव्ही एक्‍साईट या मॉडेलची सुरवातीची किंमत 20 लाख 88 हजार असून, झेडएस ईव्ही एक्‍सक्‍लूयझीव्ह या मॉडेलची किंमत 23 लाख 58 हजार रुपये आहे. पण, 17 जानेवारीपूर्वी बुकिंग केलेल्यांना एक लाख रुपयांची खास सवलत दिली आहे. 

एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी या इलेक्‍ट्रीक एसयूव्ही मोटारीच्या यशाची खात्री व्यक्त केली असून, या मोटारीतील फीचर्स भारतीय ग्राहकांच्या पसंतीला उतरून, भारतीय बाजारपेठेत इलेक्‍ट्रिक मोटारीची लोकप्रियता वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. 
 
एमजीच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीची वैशिष्ठ्ये

- एमजी झेडएस ईव्हीची सुरवातीची किंमत 20 लाख 88 हजार रुपये                                          - एमजी झेडएस ईव्ही एक्‍सक्‍ल्यूझीव्हची सुरवातीची किंमत 23 लाख 58 हजार रुपये. 
- 17 जानेवारीपूर्वी बुकिंग केलेल्यांना 1 लाख रुपयांची खास सवलत 
- दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, बंगळूर, हैदराबाद या शहरात होणार उपलब्ध. 
- इलेक्‍ट्रीक एसयूव्हीZS मध्ये 44.5 kWh क्षमतेची बॅटरी असेल. 
- केवळ 50 मिनिटात 80 टक्के बॅटरी चार्ज होणार. 
- एक चार्जिंगमध्ये 340 किलोमीटरपर्यंत धावणार. 
- झटपट चार्जिंगची सुविधा. 
- केवळ 8.5 सेकंदात ताशी 100 किलोमीटरपर्यंत गती प्राप्त करणार. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: हिंगोलीमध्ये पुन्हा बीडसारखी घटना! दोघांनी मिळून एकाला जनावरासारखं मारलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जीएसटी अनुदानात मोठी वाढ; नागपूर महापालिकेच्या तिजोरीला दिलासा

Rishabh Pant: रिषभ पंतची कॅप्टनशिप जाणार? IPL 2026 मध्ये फ्लॉप ठरल्यानंतर LSG मध्ये मोठ्या बदलांचे संकेत!

Nagpur News: ओव्हरटेकच्या प्रयत्नात उभ्या कंटेनरला दोन आयशरची धडक; नागपूर-अमरावती महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प

Nagpur District: सावनेर परिसरात एकाच दिवशी उष्माघाताचे दोन बळी; चार दिवसांत तिसरी घटना; वाढत्या तापमानाने चिंता वाढली, खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

SCROLL FOR NEXT