Michael Patra 
अर्थविश्व

मायकल पात्रा यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी निवड

वृत्तसंस्था

मुंबई : सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक मायकल देबप्रत पात्रा यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे. नियुक्तीपासून तीन वर्षांसाठी ते ह्या पदावर कार्यरत राहतील. विरल  आचार्य यांच्या राजीनाम्यानंतर मागील सहा महिन्यापासून हे पद रिकामे होते.

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. विरल आचार्य यांनी त्यांची तीन वर्षे मुदत संपायच्या आतच जुलै 2019मध्ये वैयक्तिक कारण पुढे करत राजीनामा दिला होता. रिझव्‍‌र्ह बँकेकडील राखीव रक्कम या मुद्द्यावर सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यात मतभेद झाल्यानंतर आचार्य यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर सातत्याने आचार्य यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती.त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला होता.

रिझर्व्ह बँकेचे एकुण चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. यापैकी दोघांची निवड अंतर्गत पद्धतीने होते, तर उर्वरित दोघांपैकी एक व्यावसायिक बँकर आणि पतधोरण समितीचा मुख्य अर्थतज्ज्ञ असतो. वर्तमान स्थितीत एनएस विश्वनाथन, बीपी कानुंगो आणि एमके जैन हे तिघे डेप्युटी गव्हर्नरपदी कार्यरत आहेत. शक्तिकांत दास आरबीआयचे गव्हर्नर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Water : मराठवाड्याच्या हक्काचे २५५ टीएमसी पाणी द्या; समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचे जलसंपदामंत्र्यांना दिले निवेदन

Babar Azam: बाबर आझमला सेल्फीचा इतका राग आला की... चाहत्याचा मोबाईल घेतला अन् थेट मैदानाबाहेर भिरकावला! नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

Gen Z Communication Habits: ऑनलाइन असूनही मेसेजला रिप्लाय नाही! Gen Z च्या या वागण्याचा नेमका अर्थ काय?

Latest Marathi News Live Update: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

Manwath Crime : सोशल मीडियावरील छायाचित्राच्या प्रसाराने अल्पवयीन मुलीने संपविले जीवन; मानवतमध्ये गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT