Widows day sakal
अर्थविश्व

International Widows Day : विधवा महिलांसाठी 'या' सरकारी योजना आहे सर्वात बेस्ट; जाणून घ्या

अशा परिस्थितीत ज्या महिलांना घरात बसून आर्थिकदृष्ट्या मजबूत बनायचे आहे त्यांच्यासाठी या योजना खूप उपयुक्त ठरू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक स्त्रीला लग्न आणि विवाहित जीवनाची हजारो स्वप्ने असतात. पण, जेव्हा जीवनसाथी आयुष्याच्या मध्यावरच साथ सोडतो, तेव्हा अनेकदा ही स्वप्ने मोडतात. एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू होताच, तिच्या वाट्याला केवळ दु:ख आणि निराशाच येते. आजचा दिवस 23 जून जगभरात ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ म्हणून ओळखला जातो.

अशा परिस्थितीत ज्या महिलांना घरात बसून आर्थिकदृष्ट्या मजबूत बनायचे आहे त्यांच्यासाठी या योजना खूप उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया विधवा महिला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना

विधवा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींना पेन्शनद्वारे मदत करणे हा आहे. केंद्र सरकारने विधवा महिलांना मदत मिळावी म्हणून ही योजना सुरू केली आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विधवा महिलांना या योजनेंतर्गत दरमहा 300 रुपये दिले जातील.

विधवा पेन्शन योजना

ज्या महिलांचे पतीचे अकाली निधन झाले आहे अशा महिलांना या योजनेअंतर्गत पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन योजना देशातील सर्व राज्यांमध्ये लागू आहे, परंतु तिची प्रक्रिया वेगवेगळी आहे. ही योजना विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करते.

महिला ई हाट योजना

या योजनेतून महिला स्वावलंबी होऊ शकतात. या योजनेचा मुख्य उद्देश विधवा महिलांना लाभ मिळवून देणे हा आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने महिला ई-हाट योजनेंतर्गत एक प्लॅटफॉर्म तयार केले आहे, ज्याद्वारे महिलाही त्यांच्या कलेतून कमाई करू शकतात.

महिला शक्ती केंद्र योजना

केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. विधवा स्त्रिया देखील या योजनेद्वारे स्वतःसाठी लाभ घेऊ शकतात. ही योजना महिलांचे आरोग्य, रोजगार, डिजिटल साक्षरता इत्यादी सुविधा पुरवते.

शिलाई मशीन योजना

ही योजना 2020 मध्ये सुरू झाली. शिलाई मशीन योजनेअंतर्गत गरीब महिला किंवा विधवा महिलांना रोजगार मिळू शकतो. या योजनेतून गरजू महिलांना शिलाई मशीन पुरविण्यात येते.

Anthropic IPO: ChatGPT ला टक्कर देणाऱ्या AI कंपनीचा मोठा धमाका! IPO मधून 100 अब्ज डॉलर उभारण्याची तयारी; काय आहे प्लॅन?

Ambabai Temple Kirnotsav: अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव अन् दिवाळी एकाच कालावधीत; गरुड मंडपाचीही होईल चाचणी

Latest Marathi News Live Update : ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज दुपारी ४ वाजता मंत्रालयात महत्त्वाची बैठक

१२ भूखंड , आलिशान फ्लॅट, फॉर्च्युनर अन् दीड किलो सोनं...गरीबांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्याची कोट्यवधींची संपत्ती उघड

पुण्यात मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलचा धिंगाणा! पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या गेटला कारची धडक; कर्मचारी ताब्यात

SCROLL FOR NEXT