अर्थविश्व

मोबाईल बँकिंगचे 'हे' अॅप करू नका डाऊनलोड

वृत्तसंस्था

मुंबई : कॅशलेस व्यवहारांसाठी अनेक खातेदार मोबाईल बँकिंगचा वापर करत आहेत. मात्र, अशा खातेदारांना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नव्या प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ शकते, असा इशारा दिला आहे. यूपीआय अॅपच्याद्वारे ग्राहकांच्या खात्यातील हजारो कोटी रुपये हॅकर्सकडून चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड करू नये, असे आरबीआयने सांगितले आहे. 

हॅकर्सकडून अनेकदा हे अॅप डाऊनलोड करायला सांगितले जाते. त्यानंतर मोबाईलवर आलेल्या कोडच्या माध्यमातून संबंधित खातेदाराचा मोबाईल फोन रिमोटवर घेतला जातो. या अॅप कोडला मोबाईलमध्ये टाकल्यानंतर हॅकर्सकडून ग्राहकांना काही परवानग्याही मागितल्या जातात. अशाप्रकारे ग्राहकांच्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातून रक्कम काढली जाते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बँकेने सर्व 'कमर्शिअल बँकां'ना दक्षतेचा इशारा दिला आहे. 

दरम्यान, यूपीआय किंवा वॉलेटसारख्या पेमेंटशी संबंधित कोणत्याही मोबाईल बँकिंग अॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचेही आरबीआयने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' नागरिकांना मोफत धान्य मिळणार, 'वन नेशन, वन रेशन कार्ड'द्वारे सुविधा; प्रशासनाचा मोठा निर्णय

राशीभविष्यानुसार दिसतात गोड, पण मनात असतं वेगळंच! ‘या’ ३ राशींच्या लोकांवर विश्वास ठेवताना जरा जपून राहा म्हणे; स्वभावाचं गुपित काय?

Maharashtra Live News : कल्याण कोर्टात वकिलांचे ठिय्या आंदोलन, कोर्टामधील काम ठप्प

Pimpri Chinchwad Water Supply: आंद्रा धरणातून पिंपरी चिंचवडला पाणी नको; प्रलंबित मागण्या पूर्ण करा, आंदर मावळातील गावकऱ्यांची भूमिका

Nanibai Chikhali Bandara Repair : निसर्गाचा आधार की प्रशासनाचे दुर्लक्ष? वेदगंगा नदीवरील ऐतिहासिक 'नानीबाई चिखली बंधारा' धोक्यात! कर्नाटककडे वाहून जातेय हजारो लिटर पाणी

SCROLL FOR NEXT