modi govt. 
अर्थविश्व

सर्वसामान्यांना जबर दणका; अल्पबचत व्याजदरांमध्ये मोदी सरकारकडून भरभक्कम कपात

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काल 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2020-2021 ची समाप्ती झाली. या आर्थिक वर्षाच्या अखेरिस मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. मोदी सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने केलेली ही कपात धक्कादायक मानली जात असून मध्यमवर्गीयांच्या आयुष्यावर हा निर्णय दुरगामी परिणाम साधणारा मानला जात आहे. सरकारने छोट्या बचतींच्या व्याजदरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करुन सर्वसामान्य लोकांना मोठा झटका दिला आहे. बचत खाते, पीपीएफ, टर्म डिपॉसिट, आरडी ते वयस्कर लोकांसाठीच्या असलेल्या बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये सरकारने भरभक्कम अशी कपात केली आहे. ही कपात नवे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये लागू असेल. आज 1 एप्रिलपासून लागू झालेले हे नवे व्याजदर 30 जून 2021 पर्यंत अंमलात असतील.

बचत खात्यामधील जमा रकमेवर वार्षिक व्याज 4 टक्क्यांवरुन कमी करुन 3.5 टक्के करण्यात आला आहे. पब्लिक प्रॉव्हींडट फंड (PPF) वर आतापर्यंत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत होते, ते कमी करुन आता 6.4 टक्के करण्यात आले आहे. एका वर्षाच्या जमा रकमेवरील तिमाही व्याजदर 5.5 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांवर आणला गेला आहे. वयस्कर लोकांच्या बचत योजनांवर आता 7.4 टक्क्यांऐवजी केवळ 6.5 टक्के इतकेच तिमाही व्याज मिळणार आहे.  एका वर्षासाठीच्या टर्म डिपॉझिटवर 5.5 टक्क्यांऐवजी 4.4 टक्के व्याज मिळेल तर 2 वर्षांसाठीच्या बचतीवर आता 5.5 टक्क्यांऐवजी 5 टक्के, 3 वर्षांसाठीच्या बचतीवर 5.5 टक्क्यांऐवजी 5.1 टक्के, 5 वर्षांसाठीच्या बचतीवर 6.7 टक्क्यांवरुन 5.8 टक्के व्याजदर मिळतील. तर 5 वर्षांच्या आरडीवर 5.8 टक्क्यांवरुन 5.3 टक्के व्याजदर मिळेल. मासिक पगार खात्यावर आता 6.6 टक्क्यांऐवजी फक्त 5.7 टक्केच व्याजदर मिळणार आहे. 

नॅशनल सेव्हींग्स सर्टिफिकेटवर 6.8 टक्क्यांऐवजी केवळ 5.9 टक्के व्याजदर दिला जाईल. किसान विकास पत्रावर 6.9 टक्क्यांऐवजी 6.4 टक्के व्याज मिळेल तर मॅच्यूअर होण्याचा अवधी 124 महिन्यांवरुन वाढवून 138 महिने केला आहे. याशिवाय सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदराला 7.6 टक्क्यांवरुन 6.9 टक्क्यांवर आणण्यात आलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT