share market share market
अर्थविश्व

सहा महिन्यात १ लाखाचे केलेत तब्बल ६ लाख; २०२१ मधील तुफान पैसा कमावून देणारे शेअर्स

सुमित बागुल

यंदा शेअर बाजाराने नवनवीन उच्चांक गाठलेत. १ जानेवारी ते आतापर्यंत सेन्सेक्समध्ये तब्बल १० टक्क्यांची बढत झाल्याचं पाहायला मिळाली आहे.

शेअर बाजाराने यंदा आपल्या गुंतवणूकदारांना डबल डिजिट परतवा दिलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही शेअर आजारातील तेजी अजूनही कायम आहे. यंदा शेअर बाजाराने नवनवीन उच्चांक गाठलेत. १ जानेवारी ते आतापर्यंत सेन्सेक्समध्ये तब्बल १० टक्क्यांची बढत झाल्याचं पाहायला मिळाली आहे. तर दुरीकडे निफ्टीमध्ये देखील तब्बल १२ टक्क्यांची बढत पाहायला मिळाली आहे. या दरम्यान केवळ लार्ज कॅप शेअर्स नव्हे तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सने कमालीचा परतावा दिलाय. यातील काही शेअर्स अगदी मल्टीबॅगर्स ठरलेत.

जाणून घेऊयात अशाच काही निवडक मल्टिबॅगर शेअर्सबाबत

अनंत राज । Anant Raj

अनंत राजमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कंपनीने १४० टक्के परतावा दिला आहे. अनंत राज या कंपनीने आतापर्यंत १४० टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. १ जानेवारी रोजी या शेअरची किंमत २७ रुपये इतका होता. जो आता झालाय ६५ रुपये इतका आहे. या शेअरने ६९ रुपयांचा उच्चांक गाठलाय. अनंत राज कंपनीची मार्केट कॅप 1 हार 923 करोड इतकी आहे. म्हणजे तुम्ही या शेअरमध्ये १ जानेवारीला १ लाख रुपये गुंतवले असते तर ते आता २ लाख ४० हजार झाले असते.

टी एन पेट्रो प्रोडक्ट्स । T N Petro Products

१ जानेवारीपासून आतापर्यंत या कंपनीने साधारणतः १५० टक्के परतावा दिलाय. १ जानेवारी २०२१ रोजी या शेअरची किंमत ४३ रुपये इतकी होती जी सध्या १०६ रुपयांवर आहे. या शेअरने ११० रुपयांचा उच्चांक गाठत मागील एका वर्षातील उच्चांक गाठला होता. या कंपनीची मार्केट कॅप साधारणतः ९५८ करोडच्या जवळपास आहे. म्हणजे तुम्ही या शेअरमध्ये १ जानेवारीला १ लाख रुपये गुंतवले असते तर ते आता २ लाख ५० हजार झाले असते.

रिलायंस इंफ्रा | Reliance Infra

रिलायन्स इन्फ्रा या शेजारणी ८ जूनच्या सत्रात मागील एक वर्षातील उच्चांक गाठलाय. या शेअरने आतापर्यंत साधारणतः १८७ टक्के परतावा दिला आहे. या शेअरचा भाव या वर्षात २८ वरून वाढून ७७ रुपयांवर गेलाय. हा शेअर मागील ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. या कंपनीची मार्केट कॅप 2 हजार 24 करोड इतकी आहे. म्हणजे तुम्ही या शेअरमध्ये १ जानेवारीला १ लाख रुपये गुंतवले असते तर ते आता २ लाख ८७ हजार झाले असते.

share-market

मॅग्मा फिनकॉर्प । Magma Fincorp

मॅग्मा फिनकॉर्प या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल २९८ टक्के परतावा दिला आहे. १ जानेवारी २०२१ रोजी याच कंपनीच्या एका शेअरची किंमत ४१ रुपये इतकी होती. ४१ रुपायांवरून वाढून हा शेअर आता तब्बल १५९ रुपये इतकाझालाय . १७४ रुपये हा या शेअरचा मागील १ वर्षातील उच्चांक आहे. या कंपनीची मार्केट कॅप 12 हजार 145 करोड इतकी आहे. म्हणजे तुम्ही या शेअरमध्ये १ जानेवारीला १ लाख रुपये गुंतवले असते तर ते आता ३ लाख ९८ हजार झाले असते.

मॅजेस्को । Majesco

यामध्ये पहिलं नाव आहे मॅजेस्को. ८ जून २०२१ च्या सत्रात शेअरवर १० टक्क्यांचं अपर सर्किट लागलेलं पाहायला मिळालं. १ जानेवारी रोजी मॅजेस्कोची किंमत फक्त १६ रुपये प्रति शेअर होती. जी आज वाढून तब्ब्ल ९७ रुपये प्रति शेअर इतकी झाली आहे. या शेअरमधून गुंतवणूकदारांना तब्बल ५२५ टक्के रपरतव दिलाय. म्हणजे तुम्ही या शेअरमध्ये १ जानेवारीला १ लाख रुपये गुंतवले असते तर ते आता ६ लाख २५ हजार झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT