Airplane  sakal media
अर्थविश्व

विमानप्रवासाची पुढीलवर्षी हनुमानउडी; मॉर्गन स्टॅन्लेचा अहवाल

कृष्ण जोशी

मुंबई : कोरोनामुळे (corona) थंडावलेला जागतिक विमानप्रवास (Airplane travelling) पुढीलवर्षी हनुमानउडी घेण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यात पूर्वीप्रमाणे वाढ होण्यास वेळ लागेल, असा अहवाल मॉर्गन स्टॅन्ले (morgan stanlay) तर्फे देण्यात आला आहे. पुढीलवर्षी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या (company authorities) प्रवासात वाढ होईल, मात्र कोरोनापूर्व काळाचा (corona) विचार केला तर यावर्षीही विमानप्रवास निम्म्याने कमीच राहण्याची शक्यता आहे. अद्यापही सर्वत्र व्हर्चुअल मिटींग (virtual meeting) तसेच वर्क फ्रॉम होम असल्याने प्रवासाचे प्रमाण कमीच राहील, असे दाखवून दिले जात आहे.

आता प्रवासीच विमानप्रवासाला उत्सुक आहेत. त्यामुळे कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत पुढीलवर्षी विमानप्रवासाचे प्रमाण 78 टक्क्यांपर्यंत जाईल, असे मॉर्गनच्या ग्लोबल कॉर्पोरेट ट्रॅव्हल सर्व्हे 2021 मध्ये म्हटले आहे. परदेश प्रवासाबाबत कंपन्या हात आखडता घेणार असल्या तरी देशांतर्गत छोटा विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल, असाही अंदाज आहे.

मॉर्गनतर्फे अमेरिका, युरोपसह जगातील अनेक ट्रॅव्हल कंपन्यांशी बोलून हे सर्वेक्षण करण्यात आले. प्रवासीसंख्या वाढण्याच्या बेतात असली तरीही कंपन्यांचा विमानप्रवासावरील खर्च पुढीलवर्षीही कमीच राहील असा 77 टक्के सहभागींचा अंदाज आहे. पुढील वर्षअखेरीस हवाईप्रवास पूर्वपदावर येईल, असे 43 टक्के मॅनेजरना वाटते तर 27 टक्के लोक याच्याशी सहमत नाहीत.

विमानप्रवासाच्या बाबतीत छोट्या कंपन्या लौकर पूर्वपदावर येतील, मात्र मोठ्या कंपन्या या खर्चात कपात करतील. सध्या व्हर्चुअल मिटिंग सुरु असल्याने ही स्थिती राहणार आहे. कोरोनाची भीती हळुहळू जाईल, मात्र कॉस्ट कटिंग, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचवणे आदी कारणांमुळे व्हर्चुअल मिटिंग सुरूच राहतील, असाही अंदाज आहे. कोरोनामुळे खासगी विमानांचा वापरही वाढला आहे, तो तसाच राहील किंबहुना वाढेलही असे अनेक कंपन्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

Beed News: इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी विरोधात बीडमध्ये एल्गार पँथर सेना आणि आंबेडकर विकास मंच आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT