Mukesh Ambani  Sakal
अर्थविश्व

Mukesh Ambani : मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचाई यांना अंबानींनी 'या' बाबतीत टाकले मागे

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Reliance Chairman Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. ब्रँड फायनान्सच्या जगातील टॉप सीईओंच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

Nvidia चे CEO Jensen Huang आणि Reliance Industries Limited चे मुकेश अंबानी यांना ब्रँड फायनान्सच्या ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स-2023 मध्ये अनुक्रमे पहिले स्थान मिळाले आहे. आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

मुकेश अंबानी आता जगातील टॉप सीईओंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. ते भारतात पहिले तर जागतिक क्रमवारीत त्यांना दुसरे स्थान मिळाले आहे. मुकेश अंबानी यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना मागे टाकले आहे

ब्रँड गार्डियनशिप इंडेक्सच्या या यादीत मुकेश अंबानी यांना 81.7 गुण मिळाले आहेत. तर पहिल्या क्रमांकावर असलेले अमेरिकन उद्योगपती जेन्सेन हुआंग यांना 83 गुण मिळाले आहेत.

मुकेश अंबानी फक्त 2 गुणांनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही यादी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त इंडेक्स ब्रँड फायनान्सने तयार केली आहे. त्यासाठी कंपन्यांच्या सीईओंची कार्यक्षमता, कंपनीच्या वाढीतील त्यांची भूमिका, शेअर्सच्या किंमती पुढे नेण्यात त्यांची भूमिका या गोष्टींचे मूल्यमापन केले जाते.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

टॉप 100 मध्ये 6 भारतीय सीईओ :

भारतीय सीईओंनी चांगले काम केले आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, मुकेश अंबानी आणि एन चंद्रशेखरन यांना टॉप 10 मध्ये स्थान मिळाले आहे. याच टॉप 100 मध्ये 6 भारतीय सीईओ पोहोचले आहेत.

शिवाय, क्रमवारीतील पहिल्या 10 पैकी 6 भारतीय वंशाचे आहेत, ज्यापैकी 4 भारतीय-अमेरिकन आहेत (सत्या नाडेला तिसरे, शंतनू नारायण चौथे, सुंदर पिचाई पाचव्या आणि पुनित रेन्जेन सहाव्या स्थानावर आहेत). ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स-2023 नुसार भारतीय वंशाच्या सीईओंचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT