अर्थविश्व

शेअर बाजारात भूकंप, 'दलाल स्ट्रीट'साठी आजचा दिवस ठरला 'ब्लॅक फ्रायडे' !

कृष्ण जोशी

मुंबई, ता. 26 : अनेक दिवस तेजीत असलेल्या शेअरबाजारातून मोठ्या गुंतवणुकदारांनी आज मोठ्या प्रमाणावर नफारुपी विक्री केल्याने आज शेअर बाजारात अक्षरशः भूकंप झाला. आज सेन्सेक्स 1,939 अंशांनी तर निफ्टी 568 अंशांनी कोसळला. 

निर्देशांकांमध्ये 16 फेब्रुवारीपासून सुरू झालेली घसरणीची मालिका 24 व 25 फेब्रुवारी रोजी खंडित झाली होती. मात्र आज ती घसरणीची मालिका पुन्हा सुरु झाली. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची स्पष्ट चिन्हे, गेले काही दिवस घसरत असलेले जागतिक बाजार तसेच अमेरिकेने सिरियावर हल्ले करण्याचा आदेश दिल्याने तणावग्रस्त झालेली जागतिक परिस्थिती यामुळे आज भारतीय बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. 

आजचे सोन्याचांदीचे दर

  • 24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) - 46,740 रु. 
  • चांदी (1 किलो) - 68,800 रु. 

दोनही शेअर बाजार आज पावणेचार टक्क्यांहूनही जास्त कोलमडले. दिवसअखेरीस मुंबई शेअर बाजार 49,099 अंशांवर तर राष्ट्रीय शेअर बाजार 14,529 अंशांवर स्थिरावला. आजचा सेन्सेक्सचा उच्चांक व नीचांक लक्षात घेतला तर सेन्सेक्समधील घसरण सुमारे 2,148 अंशांची होती. 

आजच्या घसरणीत बँकिंग आणि वित्तसंस्थांच्या समभागांची सर्वात जास्त पडझड झाली. मात्र त्यातून कोणतेही क्षेत्र सुटले नाही. सेन्सेक्समधील प्रमुख 30 समभाग तर निफ्टीमधील प्रमुख 50 समभाग यांच्यापैकी सर्वच्या सर्व समभाग आज तोटा दाखवीत बंद झाले.

सेन्सेक्समधील 3,101 समभागांपैकी 59.75 टक्के म्हणजे 1,853 समभागांचे दर घटले, 34.25 टक्के म्हणजे 1,062 समभागांचे दर वाढले तर सहा टक्के म्हणजे 186 समभागांचे दर स्थिर राहिले. राष्ट्रीय शेअर बाजारातील 2,234 पैकी 1,324 समभाग पडले तर 571 वाढले व 339 स्थिर राहिले.  

आज बँका-वित्तसंस्था, वाहन उद्योग, धातूनिर्मिती व औषधनिर्मिती क्षेत्र, आयटी आदी सर्व क्षेत्रांचे समभाग कोलमडले. ऍक्सिस बँक, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँख, स्टेट बँक या समभागांचे दर चार ते सहा टक्के कमी झाले. तर एअरटेल, बजाज ऑटो, टीसीएस, एशियन पेंट्स तीन ते चार टक्के पडले.

रिलायन्स (बंद भाव 2,083 रु.), आयटीसी (204 रु.), सनफार्मा (595 रु.), इन्फोसिस (1,252 रु.), डॉ. रेड्डी (4,424 रु.) हे समभागही एक ते तीन टक्के कोलमडले. 

mumbai news nifty bse nse black friday on dalal street sensex dropped by 1939 points

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT