SIP esakal
अर्थविश्व

कोट्याधीश व्हायचयं करा SIP मध्ये गुंतवणूक; मिळतील 2 कोटी रूपये

म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

शिल्पा गुजर

म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूक (Mutual fund investments) हा असा एक पर्याय आहे, जो तुम्हाला लाँग टर्ममध्ये अगदी सहज मोठा फंड तयार करून देऊ शकतो. म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी दीर्घ कालावधीत अर्थात लाँग टर्ममध्ये 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा (Refund) दिला आहे. म्युच्युअल फंडातील (Investments)गुंतवणूक एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) करता येते. जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपयांचा निधी मिळवायचा असेल, तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल हे सहज कळू शकते.

2 कोटी रुपयांचे कॅलक्युलेशन (Calculation)समजून घेऊया

SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने, 15 वर्षांत 2 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल हे समजून घेऊ.

जर तुम्ही दर महिन्याला रु 40,000 गुंतवले आणि 15 वर्ष सातत्य ठेवले तर तुम्ही 2 कोटींचा ( 2,01,83,040 रु.) फंड सहज तयार करू शकता. (अंदाजे वार्षिक परतावा 12 टक्के आहे.)

कोणकोणत्या कंपन्यांनी भरघोस परतावा (Refund)दिला

गेल्या 15 वर्षांत, निप्पॉन इंडिया ईटीएफ बँक फंडाने 14.80 टक्के वार्षिक परतावा दिला आहे, तर क्वांटम लाँग टर्म इक्विटी व्हॅल्यू फंडाने 13.88 टक्के परतावा दिला आहे. (निधीच्या कामगिरीची माहिती व्हॅल्‍यू रिसर्चमधून घेण्यात आली आहे.)

किती संपत्ती वाढते

जर तुम्ही 15 वर्षांसाठी SIP मध्ये मासिक 40,000 रुपये गुंतवले असतील, तर शेवटी तुमच्या संपत्तीत सुमारे 1.29 कोटी रुपयांची वाढ होते. या संपूर्ण कालावधीत गुंतवणूक फक्त 72 लाख रुपये असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा अंदाजे परतावा आहे, बाजारातील अस्थिरता म्युच्युअल फंड योजनेच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.

वयाच्या 40 व्या वर्षी 2 कोटी रुपयांचा निधी

म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण, यामुळे तुम्हाला दीर्घ मुदतीपर्यंत परताव्याचा लाभ घेण्याची संधी मिळते. समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 40,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली, तर वयाच्या 40 व्या वर्षी तुमच्याकडे 2 कोटी रुपये असतील.

सिस्टेमॅटिक (Systematic) गुंतवणूक करा

एसआयपी हा गुंतवणुकीचा पद्धतशीर (Systematic) पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावाही जास्त आहे. मात्र, यामध्येही धोकाही आहे, हे लक्षात ठेवा . त्यामुळे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, टारगेट आणि रिस्‍क प्रोफाइल पाहून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT