Mutual Fund  sakal
अर्थविश्व

Mutual Fund : 'या' आहेत 3 वर्षात पैसे दुप्पट करणाऱ्या योजना; जाणून घ्या किती मिळणार परतावा

तुम्ही म्युच्युअल फंड मधील योजनेत पैसे गुंतवून चांगले रिटर्न मिळवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

अल्पावधीत तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही तुम्ही म्युच्युअल फंड मधील योजनेत पैसे गुंतवून चांगले रिटर्न मिळवू शकता. आम्ही तुम्हाला IDFC म्युच्युअल फंडाच्या टॉप 7 योजनांची माहिती सांगणार ​​आहोत. या म्युच्युअल फंड योजनांपैकी एका योजनेने 3 वर्षांत दुप्पट पैसे रिटर्न मिळवून दिले आहेत, तर उर्वरित योजनांनीही 3 वर्षांत खूप चांगले रिटर्न दिले आहेत.

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

'या' आहेत पैसे दुप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना

IDFC स्टर्लिंग व्हॅल्यू म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांत दरवर्षी सरासरी 28.11% परतावा दिला आहे. येथे 1 लाख रुपये गुंतवल्यास 3 वर्षांत 2.10 लाख रुपये रिटर्न मिळवू शकता.

IDFC इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांत दरवर्षी सरासरी 25.01% परतावा दिला आहे. येथे 1 लाख रुपये गुंतवल्यास 3 वर्षात 1.95 लाख रुपये रिटर्न मिळवू शकता.

IDFC कोअर इक्विटी म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 20.60% परतावा दिला आहे. येथे 1 लाख रुपये गुंतवल्यास 3 वर्षांत 1.75 लाख रुपये रिटर्न मिळवू शकता.

IDFC निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांत दरवर्षी सरासरी 17.38% परतावा दिला आहे. येथे 1 लाख रुपये गुंतवल्यास 3 वर्षांत 1.61 लाख रुपये रिटर्न मिळवू शकता.

IDFC लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांत दरवर्षी सरासरी 16.48% परतावा दिला आहे. येथे 1 लाख रुपये गुंतवल्यास 3 वर्षांत 1.58 लाख रुपये रिटर्न मिळवू शकता.

या म्युच्युअल फंड योजनांनी चांगला परतावा देखील दिला आहे IDFC फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांत दरवर्षी सरासरी 15.37 टक्के परतावा दिला आहे. येथे 1 लाख रुपये गुंतवल्यास 3 वर्षांत 1.53 लाख रुपये झाले आहेत.

IDFC फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 14.29% परतावा दिला आहे. येथे 1 लाख रुपये गुंतवल्यास 3 वर्षांत 1.50 लाख रुपये झाले आहेत.

टीप: या म्युच्युअल फंड योजनांचा रिटर्न 8 डिसेंबर रोजी NAV च्या आधारे मोजला गेला आहे. क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT