अर्थविश्व

म्युच्युअल फंडांकडे  पैशाचा प्रचंड ओघ 

वृत्तसंस्था

मुंबई : म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 लाख कोटी रुपयांचा ओघ म्युच्युअल फंडांकडे वळविला आहे. म्युच्युअल फंडात छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना भौतिक मालमत्तांकडून आर्थिक मालमत्तांकडे वळण्यास मदत होऊ लागली आहे. 

"ऍम्फी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी एनएस व्यंकटेश म्हणाले, की गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू असूनदेखील छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात चांगली गुंतवणूक केली आहे, तसेच गेल्या महिन्यात 1.5 लाख नवीन गुंतवणूकदार जोडले गेले आहेत. 

"ऍम्फी'च्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये 1 लाख 42 हजार 359 कोटी रुपयांची भर घातली आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे ऑक्‍टोबरमध्ये 35 हजार 529 कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली होती. 
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या या वाढत्या ओघामुळे म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रातील 42 कंपन्यांची नोव्हेंबर 2018 अखेरची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) 24.03 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोचली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jadeja-Samson Reaction: 'आता निरोपाची वेळ...', जडेजा-सॅमसनने IPL 2026 ट्रेडिंगनंतर दिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणालेत

Man Mum Trend: ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये! 'इथे' मुले मुलींना मिठी मारून पैसे कमवतात, ‘मॅन मम्स’ ट्रेंड नेमका काय? कसा सुरू झाला?

Kolhapur News: शेतकऱ्यांच्या मनातील मोठा प्रश्न ‘कोणाचा कारखाना अधिक दर देतो?’ याच तुलनेवर उमेदवारांचे भविष्य ठरणार!

हजारो-लाखो नाही तर फक्त 2 मतांमुळे मैथिली हरलेली रिअलिटी शो; लहान वयापासूनचं टॅलेंट ते सोशल मीडिया स्टार

Nashik Kumbh Mela : 'आम्ही १ कोटी स्वीकारणार नाही!' आखाड्यांना प्रत्येकी ५ कोटींचा निधी द्या; साधू-महंतांची मागणी!

SCROLL FOR NEXT