Investment schemes for tax saving
Investment schemes for tax saving esakal
अर्थविश्व

NSC : गुंतवणूकीवर टॅक्स कपातीसह उत्तम व्याज दर देणारी सरकारी योजना!

शिल्पा गुजर

तुम्हाला सुरक्षित गुंतवणूकीसह चांगला परतावाही मिळवायचा असेल तर ही स्कीम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

तुम्हाला सुरक्षित गुंतवणूकीसह चांगला परतावाही मिळवायचा असेल तर ही स्कीम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास एक नाही अनेक फायदे तुम्हाला मिळतात. या स्कीमचे नाव आहे नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (National Savings Certificates), ज्यामध्ये तुम्ही 1000 रुपये गुंतवले तर तुम्हाला रिटर्नसह 1389.49 रुपये मिळतील.

ही भारत सरकारची एक छोटी बचत योजना (Small Saving Scheme) आहे, ज्यामध्ये तुम्ही पैसेही गुंतवू शकता. नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटमध्ये (National Savings Certificates), गुंतवणुकीवर 6.8 टक्के व्याज दिले जाते. स्कीममध्ये पाच वर्षांचा लॉक-इन पिरियड आहे. तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर सवलतीचा (Tax free)लाभही घेऊ शकता. NSC मध्ये गुंतवणुकीच्या वेळी व्याजदर संपूर्ण मॅच्युरिटी कालावधीसाठी सारखा राहतो.

किमान 1000 रुपयांची गुंतवणूक

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा (Maximum Limit) नाही. यामध्ये दरवर्षी गुंतवणूकदाराला व्याज दिले जात नाही, तर ते जमा होते. यामध्ये तुम्ही 100 च्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकता.

आयकर सवलत किती ?

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमधील (National Savings Certificate) गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते. करपात्र उत्पन्नाच्या (Taxable Income) बाबतीत, एकूण उत्पन्नातून रक्कम वजा केली जाते. एनएससीवर दरवर्षी मिळणारे व्याज हे गुंतवणूकदाराने पुनर्गुंतवणूक म्हणून मानले जाते आणि 1.5 लाखांच्या आत कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरते.

एनएससीच्या आधारावर मिळते कर्ज

तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये (National Savings Certificate) गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम मॅच्युरिटीच्या पाचव्या वर्षी किंवा शेवटच्या वर्षी पुन्हा गुंतवता येणार नाही. शेवटच्या वर्षात, NSC कडून मिळालेली व्याजाची रक्कम तुमच्या उत्पन्नात जोडली जाते आणि त्यानुसार कर लागू होतो. दुसरीकडे तुम्ही NSC च्या आधारे कर्ज घेऊ शकता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT