अर्थविश्व

कर्ज घ्यायचंय? मग 'तुमच्या'कडेच आहे सर्वात स्वस्त पर्याय!

गौरव मुठे

पुणे: भारतीयांना सोन्याचे आकर्षण अनादी काळापासून आहे. सणवार, लग्नासारखी शुभकार्ये यांसाठी सोन्याचे दागिने ही अनिवार्य गोष्ट ठरलेली आहे. त्यात गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद दिसत नाही. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार, कधी ना कधी सोने खरेदी करीतच असतो. मात्र, अडचणीच्या वेळी आपल्याकडे असलेले सोने त्या अडचणीतून मार्ग काढून देऊ शकेल, हे आपण विसरतो. कारण, एका रात्रीत पैसे उभे करण्याची ताकद या मौल्यवान धातूत आहे, असे म्हणतात आणि ते खरेही आहे. पण, तरीही सोन्याविषयी असलेल्या भावनिक गुंतवणुकीमुळे अडीअडचणीच्या वेळी आपण लगेच सोने विकायला जात नाही. एका बाजूला पैशांची गरज असते आणि दुसरीकडे सोने विकायला मन धजावत नसते, अशी विचित्र अवस्था होते. पण, यातूनच "सोने तारण कर्ज' किंवा "गोल्ड लोन' हा मध्यममार्गी उपाय उपयोगी ठरू शकतो. 
आता अल्पकाळासाठी तुम्हाला कर्ज हवे असेल किंवा अगदी लवकरात लवकर कर्ज हवे असेल, तर "सकाळ मनी'च्या माध्यमातून "गोल्ड लोन'देखील घेता येणार आहे. यासाठी "सकाळ मनी'ने आघाडीच्या बॅंकांशी "टाय-अप' केले असून, त्यांच्या माध्यमातून हे कर्ज सुलभ रीतीने, आकर्षक दराने आणि त्वरित उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

कसे मिळवाल गोल्ड लोन? 

"इन्स्टंट गोल्ड लोन'द्वारे तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर 10 हजार ते 15 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. शिवाय, तुमच्याकडे 24 कॅरेट सोन्याचे "बॅंक कॉइन' असेल, तर त्यावरदेखील कर्ज मिळू शकते. मात्र, असे 50 ग्रॅमपर्यंतचेच सोने तुम्ही तारण ठेवू शकता. तुमचे सोने वा दागिने बॅंकेकडे अगदी सुरक्षित स्वरूपात ठेवले जातात. त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नसते. संबंधित बॅंकेच्या मान्यताप्राप्त सराफाकडून सोन्याचे वा दागिन्यांचे मूल्य (व्हॅल्युएशन) काढले जाते आणि कमीत कमी सहा महिन्यांपासून जास्तीत जास्त बारा महिन्यांसाठी हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज रोख स्वरूपातदेखील मिळू शकते. मात्र, त्यापेक्षा अधिक रकमेचे कर्ज असेल, तर ते "एनईएफटी' किंवा "आरटीजीएस'च्या माध्यमातून देण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे सोने तारण कर्ज मुदतीच्या आधी फेडले, तर त्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 

"ईएमआय'चे नो टेन्शन! 
"गोल्ड लोन'मध्ये सोने तारण ठेवून घेतलेल्या कर्जावर दर महिन्याला हप्ता (ईएमआय) भरण्याचे टेन्शन नसते. तशी सुविधा काही बॅंकांनी उपलब्ध करून दिली आहे. कर्जाचा कालावधी जेव्हा संपतो, त्याचवेळी व्याज द्यावे लागते. शिवाय, 18 वर्षांवरील कोणीही व्यक्ती स्वत:च्या मालकीचे असणारे सोने अशा पद्धतीने तारण ठेवून कर्ज घेऊ शकते. थेट 70 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांनादेखील "गोल्ड लोन'चा फायदा घेता येतो. यासाठी कोणत्याही उत्पन्नाचा दाखला, सिबिल स्कोअर किंवा नोकरदार असाल तर सॅलरी स्लिप देण्याचीदेखील आवश्‍यकता नसते. 

व्यावसायिकांसाठी कर्ज 
व्यावसायिकांसाठी ओव्हरड्राफ्ट (ओडी) प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. व्यावसायिकदेखील अधिक व्याजदराचे "बिझनेस लोन' न घेता "गोल्ड लोन'च्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज मिळवू शकतात. ओव्हरड्राफ्ट खात्यासाठी ऑटो स्वाइप इन आणि आउटचा पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्यात येतो. असे कर्ज विविध व्याजदरात उपलब्ध केले जाते. 

स्टॅंडअलोन गोल्ड लोन 
शेतकऱ्यांना आता "स्टॅंडअलोन गोल्ड लोन' मिळू शकणार आहे. ज्यांच्याकडे सातबारा (7/12) असेल किंवा नसेल अशा शेतकऱ्यांनाही कर्ज मिळू शकते. शेतकऱ्याकडे सातबारा असल्यास कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. बारा महिने मुदतीचे कर्ज घेतल्यास सोन्याच्या मूल्याच्या 75 टक्‍क्‍यांपर्यंत किंवा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज घेतल्यास सोन्याच्या मूल्याच्या 70 टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज दिले जाते. मात्र, यासाठी सोने किमान 18 कॅरेटचे असणे आवश्‍यक असते. 
तुमच्या सोन्यावर बॅंकेकडून विमासंरक्षण घेतले जाते, त्यामुळे तुमचे सोने सुरक्षित राहते. त्याला काही धोका पोचल्यास बॅंक तुमच्या सोन्याच्या मूल्याइतके पैसे तुम्हाला परत करते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही भौगोलिक मर्यादा नाहीत. म्हणजेच, कोल्हापूरचा माणूस पुण्यातूनदेखील कर्ज घेऊ शकतो, हे विशेष. 

"सकाळ मनी'कडून सोय 
तातडीच्या गरजेच्या वेळी अन्य कोणत्याही प्रकारच्या कर्जापेक्षा सोने तारण कर्ज किंवा "गोल्ड लोन' घेणे निश्‍चितच सोईस्कर आहे आणि त्याची सोय "सकाळ मनी'ने सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी 7447450054 या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, त्यानंतर संबंधितांशी स्वतंत्रपणे संपर्क साधला जाणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT