Sakal-Money
Sakal-Money 
अर्थविश्व

सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय?

सकाळ वृत्तसेवा

बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात; पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच असे नाही. हीच बाब लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘हेल्थ चेक-अप’ करून घेतो, त्याच धर्तीवर ‘वेल्थ चेक-अप’ किंवा ‘पोर्टफोलिओ चेक-अप’ करता येईल का, असा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातून येणाऱ्या वाढत्या मागणीमुळे येत्या शनिवारी (ता. ३ ऑगस्ट) हा उपक्रम ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयात आयोजित केला जाणार आहे.

सामाजिक गरज लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला असून, त्याअंतर्गत ‘सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर’ (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी आर्थिक नियोजनाबद्दल; तसेच सर्वांगीण गुंतवणुकीबाबत वैयक्तिकरीत्या मार्गदर्शन करणार आहेत. अशा मार्गदर्शनासाठी ‘सीएफपीं’कडून एरवी किमान ५-१० हजार रुपयांपर्यंतचे सल्लाशुल्क आकारले जाते. पण, ‘सकाळ मनी’ने आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना व्यक्तिगतरीत्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

‘सकाळ मनी’चा हा उपक्रम ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘बी’ झेन बिल्डिंग, पाचवा मजला, पिंपळे पेट्रोल पंपाजवळ, ‘सेंट्रल’ मॉलच्या समोर, पुणे-मुंबई रस्ता, पिंपरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यात सहभागी होऊन तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळविण्यासाठी नावनोंदणी करणे अत्यावश्‍यक आहे. यासाठी ७४४७४५०१२३ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित मिस्ड कॉल देऊन ठेवावा. नावनोंदणी केलेल्यांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. राज्याच्या इतर शहरांतही असाच उपक्रम आयोजित करण्याचा ‘सकाळ मनी’चा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT