Nilesh Sathe writes Pay attention here deciding on a life insurance policy consider the following sakal
अर्थविश्व

आयुर्विमा घेताय? इकडे लक्ष द्या!

विमा घेताना मात्र अनेकजण ‘मला वेळ नाही, कुठे सह्या करू सांगा,’ असे म्हणून विमा घेतात. विमा घेण्याचा निर्णय डोळसपणे आणि समजून उमजून घेतला तर नंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

विमा घेताना मात्र अनेकजण ‘मला वेळ नाही, कुठे सह्या करू सांगा,’ असे म्हणून विमा घेतात. विमा घेण्याचा निर्णय डोळसपणे आणि समजून उमजून घेतला तर नंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.

- नीलेश साठे

आयुर्विमा घेण्याचा निर्णय अनेकदा घाईने घेतला जातो. विमा प्रतिनिधीला पुरेसा वेळ देऊन, त्याने सांगितलेला विमा प्रकार आपल्या गरजांचा विचार करून योग्य आहे ना, याची खात्री करूनच विमा प्रस्तावावर सही करावी. अगदी टीव्ही किंवा फ्रीजची खरेदी करतानासुद्धा आपण चार दुकाने हिंडतो, आपल्या बजेटचा विचार करतो, त्या उपकरणाची नीट माहिती घेतो. विमा घेताना मात्र अनेकजण ‘मला वेळ नाही, कुठे सह्या करू सांगा,’ असे म्हणून विमा घेतात. विमा घेण्याचा निर्णय डोळसपणे आणि समजून उमजून घेतला तर नंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.

आयुर्विमा पॉलिसीचा निर्णय घेण्यापूर्वी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे...

विम्याचा हप्ता हा वयावर अवलंबून असल्याने कमी वयात दीर्घ मुदतीचा आणि मासिक उत्पन्नाच्या किमान १०० पट रकमेचा टर्म इन्शुरन्स (मुदत विमा) घ्यावा. दीर्घ मुदतीचा विमा घेतल्याने विमा हप्ता कमी भरावा लागतो; शिवाय आपल्याला दीर्घकाळ विमा संरक्षण मिळते. विमा हप्ता मुदत संपेपर्यंत तेवढाच असतो. आपले उत्पन्न मात्र वाढत जाते, महागाई वाढत जाते, तरी विमा हप्ता वाढत नाही. विमा कंपनी निवडताना विमा हप्त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा. विमा कंपनीची जनमानसातील प्रतिमा, क्लेम म्हणजे दावे निपटारा करण्याची तत्परता, सोयीचे कार्यालय अशा बाबी पडताळून मगच निर्णय घ्यावा.

विमा प्रतिनिधीवर उपकार किंवा त्याची एजन्सी वाचविण्यासाठी म्हणून विमा घेऊ नका. विमाविक्री ही कला आहे. विमा प्रतिनिधी जरी कितीही गोड बोलत असला (तो त्याच्या प्रशिक्षणाचा भाग असतो) तरी त्याच्या बोलण्यावर आपण भुलून जाण्याची गरज नाही. विम्याची गरज नसेल तर ठामपणे नकार द्यावा. विमा हा आपण आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी घेत असतो, विमा प्रतिनिधींच्या भल्यासाठी नाही. विमा प्रतिनिधीला मिळणारे कमिशन हा त्याचा मेहनताना असतो. त्याला मिळणाऱ्या कमिशनमधून ‘कट’ मागू नका. आजकाल बँका देखील विमाविक्री करू लागल्या आहेत. लॉकर मिळाले, सोने तारणावर कर्ज मिळाले, अशा उपकाराच्या बोझ्याखाली राहून विमा घेण्याची गरज नसते. तो बँकेच्या व्यवसायाचा भाग असतो.

विम्याचा करार हा ‘अटमोस्ट गुड फेथ’ म्हणजे परस्परांच्या पूर्ण विश्वासावर आधारित असतो. तेव्हा विमा प्रस्तावात सर्व माहिती अचूक आणि खरी द्यावी. शक्यतो विमा प्रस्तावाचा फॉर्म स्वतः भरावा किंवा जर तो एजंटाने भरला असेल तर सर्व माहिती योग्य भरली आहे ना, याची खात्री करून घ्यावी.

बचत आणि गुंतवणुकीसाठी लागणारी आर्थिक शिस्त जर आपल्याजवळ नसेल तर विम्याकडे बचतीचा अनिवार्य मार्ग म्हणून बघा. असे दिसून आले आहे, की जेवढ्या सहजपणे म्युच्युअल फंडातील रक्कम काढली जाते किंवा बँकेतील मुदत ठेव मोडली जाते, तेवढ्या सहजपणे विमा पॉलिसी ‘सरेंडर’ करून रक्कम काढली जात नाही. पॉलिसी ‘सरेंडर’ करण्याचा पर्याय हा सहसा शेवटचा पर्याय निवडला जातो.

प्राप्तिकरात सवलत मिळते म्हणून विमा घेणे चुकीचे आहे, ही सवलत कधीही बंद होऊ शकते. ‘युनिट लिंक्ड इन्शुरन्स’ घेण्यापूर्वी आपण शेअर बाजारातील जोखीम घेण्यास सक्षम आहोत ना, याची खात्री करून घ्यावी. कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन प्रस्तावित विमा प्रकाराची पूर्ण माहिती घ्यावी. विमा कंपनी ‘सम ॲश्युअर्ड’ म्हणजे विमा रकमेची आणि त्यावरील बोनसची हमी देत असते. मात्र, बोनसच्या दराची कोणतीही हमी विमा कंपनी देत नाही, हे लक्षात घ्यावे.

या सर्व बाबींचा विचार करूनही जर विमा घेतल्यानंतर आपल्याला वाटले, की हा विमा माझ्या हिताचा नाही, तर पॉलिसी मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत कोणतेही कारण न देता, आपण विमा कंपनीला ती पॉलिसी रद्द करण्यासाठी परत पाठवू शकता. मुद्रांक शुल्क; तसेच काही किरकोळ रक्कम वजा करून बाकी सर्व रक्कम विमा कंपनी परत करते. विमा घेण्यापूर्वी वरील काळजी घेतली तर नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही, अगदी जीवनभर आणि नंतरही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT