Nirmala Sitharaman sakal
अर्थविश्व

"अमेरिकी कंपन्यांकडून भारताच्या आर्थिक सुधारणांचं कौतुक"

अर्थमंत्री निर्मला सीतारामण अमेरिकेत पार पडणाऱ्या राष्ट्रीय नाणेनिधी संघ आणि जागतिक बँकेच्या परिषदेला उपस्थित आहेत.

ओमकार वाबळे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनासोबतच अमेरिकेच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांनी भारत सरकारच्या सुधारणांचे सकारात्मक वर्णन केल्याची महिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.

भारत सरकारने रेट्रोस्पेक्टिव टॅक्स माफ केल्यानंतर अमेरिकी कंपन्यांनी त्याचे स्वागत केल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामण अमेरिकेत पार पडणाऱ्या राष्ट्रीय नाणेनिधी संघ आणि जागतिक बँकेच्या परिषदेला उपस्थित आहेत.

यावेळी अर्थसचिव आणि अन्य तज्ञ देखील सहभागी होते. जगभरातील महत्वाच्या देशांची आर्थिक स्थिती आणि त्यामुळे अन्य देशांना बसलेला फटका यासंदर्भात अमेरिकेत विचारमंथन सुरू आहे. या परिषदेला सीतारामण यांनी उपस्थिती लावत भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात माहिती दिली.

विशेषत: अमेरिकी कंपन्या भारत सरकारने रेट्रोस्पेक्टिव कर रद्द करण्याच्या निर्णयामुळे खूप आनंदी आहेत, असे त्या म्हणाल्या. आम्ही केलेल्या सुधारणा आणि विशेषत: अतिरिक्त कर रद्द करण्याचा निर्णय यामुळे अमेरिकन प्रशासनाने हे अतिशय सकारात्मक पाऊल असल्याचं म्हटलं. कॉर्पोरेट जगतातील लोकांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे. दीर्घकालीन सुधारणांसाठी भारत सरकारची वचनबद्धता देखील व्यक्त केली.

गुंतवणूक प्रोत्साहन करारावर भर

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरील प्रश्नाला उत्तर देताना सीतारामण यांनी मी गुंतवणूक प्रोत्साहन करारासंदर्भात माहिती दिली. यासाठी आमच्याकडे डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे. आम्ही यावर संभाषण केले आहे. दोन्ही देशांना यावर संवाद पुढे नेण्याची इच्छा आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे, असे त्या म्हणाल्या.

महामारीनंतर सीतारामण यांचा पहिला अमेरिका दौरा

कोविड -19 महामारीनंतर सीतारामण यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. यापूर्वी वाणिज्य आणि संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी भारत-अमेरिका सामरिक संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकांना उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, अर्थमंत्र्यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान भारताच्या आर्थिक पुनरुज्जीवनाची रुपरेषा मांडली. यासह, त्यांनी दीर्घकालीन सुधारणांसाठी भारत सरकारची वचनबद्धता देखील व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT