अर्थविश्व

नोटाबंदीच्या काळात दागिने विकणाऱ्या सराफांना नोटीस 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या सराफांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान मोदींनी 2016 मध्ये पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली होती. याच पार्श्वभूमीवर सराफांना प्राप्तिकर नोटीस पाठवण्यात आली आहे. 

काळा पैसा लपविण्यासाठी बहुतांश लोकांनी सोन्याच्या खरेदीला प्राधान्य दिले. एका सराफाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात त्याच्या दुकानातील सर्व सोने-चांदी आणि दागिन्यांची विक्री झाली होती. दोन आठवड्यांत जेवढी विक्री होते तेवढी एकाच दिवसात झाली. तीन महिन्यांपूर्वी अचानक त्यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाली. त्यामध्ये मिळालेल्या मालमत्तेचा स्रोत आणि नोटाबंदीच्या काळात जमा झालेला सर्व महसूल जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सराफाने फक्त आडनाव जैन असल्याचे जाहीर केले आहे. 

सराफाकडून आता नोटिशीला आव्हान देण्यात आले आहे. मात्र, कायद्याप्रमाणे त्यांना त्या वादग्रस्त रकमेतील 20 टक्के रक्कम जमा करावी लागेल. तसेच निर्णय विरोधात गेल्यास सर्व रक्कम जमा करण्यासाठी व्यवसाय बंद करावा लागेल, असे सराफाने सांगितले. ज्वेलर्स असोसिएशनच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांच्याप्रमाणे एकूण 15 हजार सराफांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT