अर्थविश्व

BHIM UPI वरुन डिजि​टल पेमेंटला अडचण येतेय? इथं करा तक्रार

सकाळन्यूजनेटवर्क

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केलेल्या 'भीम' (भारत इंटरफेस फॉर मनी) या UPI अॅपबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी समोर येत आहेत. करोना काळात लोकांचा कल ONLINE PAYMENTS कडे जास्त वळला. पण भीम अॅपमधून पेमेंट करताना ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. काही वेळेस Transaction मध्येच अडकते. त्यामुळे ग्राहकांना कळत नाही की पैसे समोरच्या व्यक्तीला गेले की नाही ते. ज्यामुळे ग्राहक ONLINE PAYMENT करताना घाबरतात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप तयार केले असून गुगल प्ले-स्टोअरवरती ते उपलब्ध आहे. डिजिटल व्यवहारासाठी सरकारी अॅप म्हणून सुरुवातीला भीम अॅप लोकांच्या पसंतीला उतरले. मात्र, अनेकांना अॅपबाबत माहितीच नाही. सरकारी यंत्रणा, बँकांकडूनही अॅपबाबत जनजागृती केली जात नाही. त्यातच भर म्हणून व्यवहार करताना ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. 

पण आता हा प्रश्न जवळजवळ सुटला आहे. तुम्हाला जर भीम यूपीआयमार्फत (BHIM UPI) पेमेंट करण्यास समस्या असल्यास, त्याचे समाधान लवकर आणि सोपं झालं आहे. यासाठी एनपीसीआयने  (National Payments Corporation of India)  ‘यूपीआय हेल्प’लाइन सुरू केली आहे. सध्या ही सेवा फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, ICICI Bank बँक या ठराविक यूपीआय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

भीम अॅपवर ‘यूपीआय हेल्प’लाइन सुरु झाल्यामुळे आता जर तुमचे पैसे यूपीआयकडून थांबले किंवा अडकले तर त्याचा Current status तुम्हाला लगेचचं मिळेल. इतकेच नाही तर ग्राहकांना शेवटचा थांबलेला व्यवहार कुठे अडकला आणि त्याचा स्टेटस काय आहे? हे देखील माहित होईल.

हेही वाचा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT