Old Notes esakal
अर्थविश्व

तुमच्याकडं जुन्या काळातील 10 पैशांची 'ही' तीन नाणी असतील, तर कमवू शकता 9 लाख रुपये

सकाळ डिजिटल टीम

आजकाल जुन्या नोटा आणि नाणी आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या किमतीत विकत घेतली जात आहेत.

नवी दिल्ली : जर तुम्हाला जुन्या नोटा (Old Notes) आणि नाणी (Coins) जमा करण्याचा छंद असेल आणि तुम्ही खूप जुनी नाणी नोटा संग्रहित केल्या असतील, तर तुम्ही होऊ शकता करोडपती.!

तुम्हाला आता सुवर्णसंधी आली आहे की, तुम्ही जुन्या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये घेऊ शकता. आजकाल जुन्या नोटा आणि नाणी आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) मोठ्या किमतीत विकत घेतली जात आहेत, त्यामुळं जुन्या नोटा नाणी असलेले लोकही करोडपती होत आहेत. जर तुमच्याकडं 10 पैशांचे नाणे असेल तर ही बातमी पूर्ण वाचाच का ही बातमी तुम्हाला श्रीमंत करेल.

10 पैशाच नाणं द्या अन् लगेच तीन लाख रुपये कमवा अशी संधी मिळत आहे, त्यामुळं अशी संधी सोडू नका. आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी 1957 ते 1963 दरम्यान वापरात असलेले 10 पैशांचे नाणे असणे अत्यंत आवश्यक आहे. अशी नाणे ऑनलाइन विकून तुम्ही मोठी कमाई करू शकता. हे नाणे विकण्यासाठी तुम्हाला ई-बे वेबसाइटवर जावे लागेल. 1957 ते 1963 दरम्यान जारी करण्यात आलेली 10 पैशांची नाणी तांबे-निकेल धातूची होती. या नाण्यांचे वजन 5 ग्रॅम होते आणि त्यांचा व्यास 23 मिमी होता. ही नाणी मुंबई, कलकत्ता आणि हैदराबाद इथं तयार करण्यात आली होती.

नाणी नेमकी कशी हवीत?

या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि भारत लिहिलेलं दिसत आहे. तर दुसरीकडं 10 नवीन पैसे देवनागरी लिपित लिहिलेले आहेत आणि नाण्यावर “रुपयाचा दशांश” असं लिहिलं आहे. मुख्य म्हणजे या 10 पैशांच्या नाण्याच्या तळाशी टांकसाळीच्या वर्षाचा तपशील आहे. एका रिपोर्टनुसार, असं लक्षात आलं की आता तुम्ही या नाण्यांची ऑनलाइन विक्री करून भरपूर कमाई करू शकता. काही अहवालांमध्ये तर असा दावा करण्यात आलाय की, जुनी आणि दुर्मिळ नाणी 2 लाख रुपयांपर्यंत सहज विकली जाऊ शकतात. अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या लोकांना जुन्या आणि दुर्मिळ नाणी आणि नोटांची खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देतात. तुम्हाला फक्त या वेबसाइट्सवर लॉग इन करायचं आहे आणि स्वतःची विक्रेता म्हणून नोंदणी करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT