unemployment esakal
अर्थविश्व

मेटा, ट्विटर, ॲमेझॉनमधील नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना 'ही' कंपनी करणार मदत

या आठवड्यात 10,000 कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा विचार कंपन्या करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जागतिक तंत्रज्ञान उद्योगात कर्मचारी कपातीमुळे अमेरिकेतील फर्मने एक कार्यक्रम सुरू केला आहे. ज्याचा उद्देश नोकरी गमावलेल्या लोकांसाठी नवीन उद्योगासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. डे वन व्हेंचर्स या कंपनीने "फंडेड नॉट फायर्ड" हा उपक्रम चालू केला आहे. टेक क्रंचच्या अहवालानुसार, कंपनी वर्षाच्या अखेरीस 20 स्टार्टअप ग्रुपमध्ये 1,00,000 डॉलरचे चेक (सुमारे 81 लाख रुपये) देणार आहे.

मेटा, ट्विटर, ॲमेझॉन कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्या कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी व्हेंचर फर्मने आपल्या 52.5 दशलक्ष डॉलर निधीतून 5 दशलक्ष डॉलर (आणि जास्तीत जास्त 10 दशलक्ष डॉलर) देणार आहे.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

डे वन व्हेंचर्स कंपनीच्या संस्थापीका माशा बुचर यांनी  रशियामध्ये राजकारणी आणि टीव्ही रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी सांगितले की, या वर्षी अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्यातील हजारो कर्मचार्‍यांपैकी किमान 0.1% ते 1% कर्मचारी नवीन कंपनी सुरु करू शकतील आणि कंपन्यांचे संस्थापक बनतील. हा कार्यक्रम कोणालाही दान देण्याचा नसून एक गंभीर व्यवसाय आहे. कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीत कोणतेही प्राधान्य दिले जात नाही.

डे वन व्हेंचर्स व्यतिरिक्त, पुढच्या पिढीतील उद्योजकांना सक्रिय करण्यास मदत करण्यासाठी पुढे आलेल्या इतर कंपन्यांमध्ये झेड फेलो आणि क्लीओ कॅपिटलची नोकरी सोडलेल्या कामगारांसाठीची फेलोशिप या उपक्रमांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात अॅमेझॉनसह उच्च-प्रोफाइल कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली आहे. या आठवड्यात 10,000 कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा विचार कंपन्या करत आहेत. ऑनलाइन पेमेंट कंपनी स्ट्राइप आणि कार-हेलिंग अॅप Lyft, देखील अलीकडेच मोठ्या कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहेत. Lyft Inc. आणि Meta Inc ने त्यांच्या कर्मचार्‍यांपैकी 10% पेक्षा जास्त कर्मचारी कपात केली आहे. इलॉन मस्कने नव्याने विकत घेतलेल्या ट्विटर कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीलाच 7,500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT