Online Shopping
Online Shopping sakal
अर्थविश्व

Online Shopping : ऑनलाइन शॉपिंग करताना बनावट माल कसा ओळखायचा? जाणून घ्या 'या' गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

देशात ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अनेक वेळा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर केलेल्या उत्पादनांमध्ये बनावट वस्तू मिळण्याची शक्यता असते आणि ग्राहक खऱ्या आणि बनावटमधील फरकाबद्दल चिंतेत असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एखादी वस्तू ऑनलाइन ऑर्डर केले असेल आणि ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले तर तुम्ही काय कराल? खऱ्या आणि बनावट वस्तूंमध्ये फरक कसा करायचा ते जाणून घ्या.

ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या नावात तुम्हाला चूक आढळून आली तर ते उत्पादन बनावट असल्याची शक्यता आहे. अनेकदा काही कंपन्या ब्रँडच्या नावासारखी नावे ठेवून ग्राहकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात. ब्रँडेड उत्पादने ज्या नावाने येतात, त्या नावाची खास ओळख असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

प्रत्येक ऑनलाइन साइटवर उपलब्ध असलेल्या उत्पादनांबद्दल ग्राहक रिव्हूव्ह देखील आहेत, त्यामुळे तेथे तुम्ही हे तपासू शकाल की ज्या ग्राहकांनी आधी खरेदी केली आहे त्यांना ते उत्पादन कसे वाटले. आपल्याला रिव्हूव्ह योग्य वाटत नसल्यास, आपण खरेदी करण्यापासून थांबू शकतो.

बाजारात सध्या असलेल्या सुप्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून नेहमी ऑनलाइन शॉपिंग करा. कारण या कंपन्यांचा युजर बेस खूप मोठा आहे, त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ते त्यांच्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शक्य ते सर्व पावले उचलतात.

तुम्ही नवीन वेबसाइटवरून खरेदी करत असाल तर थोडी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण येथे बनावट वस्तू मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. अनेक वेळा पैसे भरल्यानंतर उत्पादन मिळेल की नाही, अशी भीती असते. म्हणूनच कंपनीशी संबंधित रिव्हूव्ह पाहिल्यानंतर खरेदी करणे चांगले आहे.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स साइटवरून एखादे उत्पादन ऑर्डर कराल तेव्हा डिलिव्हरी दरम्यान वस्तू पूर्णपणे तपासा. कारण अनेकवेळा दिसून आले आहे की, उत्पादन पॅकेजमध्ये येत नाही. काही वेळा पॅकेटमधून बटाटे आणि दगडही बाहेर आले आहेत. शिपमेंट दरम्यान अशी फसवणूक होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT