Bhushan Godbole  Sakal
अर्थविश्व

बांधकाम साहित्य क्षेत्रातील संधी

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६२,२९३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १८,५१२ अंशांवर बंद झाले

भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६२,२९३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १८,५१२ अंशांवर बंद झाले. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट, वाढती महागाई, व्याजदरवाढीचे चक्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील ‘सेन्सेक्स’ने गेल्या आठवड्यात शुक्रवारी ६२,४४७ अंशांचा नवीन उच्चांक गाठला आणि ६२,२९३ अंशांवर बंद झाला. दीर्घावधीच्या आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ५०,९२१ ही ‘सेन्सेक्स’ची महत्त्वाची आधारपातळी आहे. गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने नवीन उच्चांक गाठला, मात्र ‘निफ्टी’ निर्देशांक १८,६०४ या पूर्वी नोंदविलेल्या उच्चांकाच्या समीप येऊन थांबला आहे.

मध्यम अवधीच्या आलेखानुसार सध्या ‘बॅंक निफ्टी’ तेजीचा कल दर्शवत आहे. ३२,१५५ ही ‘बॅंक निफ्टी’ची महत्त्वाची आधारपातळी आहे. वाढत्या व्याजदराच्या परिस्थितीत, ज्या बँका कर्जावरील व्याजदरातील वाढ ग्राहकांपर्यत पोहचवण्यात सक्षम असतील त्यांना अधिक फायदा होईल. दीर्घावधीच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रातील दिग्गज ‘एचडीएफसी बँके’च्या शेअरचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा. जाहीर झालेल्या तिमाही निकालांनुसार वाढलेल्या गॅस किमतींमुळे बांधकाम साहित्य क्षेत्राशी निगडित ‘कजारिया सिरॅमिक्स’ या कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला अशा प्रकारची समस्या दीर्घावधीसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने संधी असू शकते का, याचा विचार करूया.

कजारिया सिरॅमिक्स (शुक्रवारचा बंद भाव : रु.१,१११)

कजारिया सिरॅमिक्स ही कंपनी सिरॅमिक आणि व्हिट्रिफाइड टाइल्सचे उत्पादन आणि व्यापारात गुंतलेली आहे. ही कंपनी देशातील या टाइल्सची सर्वांत मोठी आणि जगातील आठवी सर्वांत मोठी उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने सिरॅमिक वॉल आणि फ्लोअर टाइल्स, पॉलिश आणि ग्लेझ्ड व्हिट्रिफाइड टाइल्स, बाथवेअर सोल्यूशन्स, प्लायवुड आणि लॅमिनेटचा समावेश आहे. कंपनी आपली उत्पादने तीन मुख्य ब्रँड्सअंतर्गत विकते जसे, की कजारिया (टाईल्ससाठी), केरोविट (सॅनिटरीवेअर आणि बाथवेअर सोल्यूशन्ससाठी) आणि कजारिया प्लाय (प्लायवुड आणि लॅमिनेटसाठी). कंपनीकडे १७०० पेक्षा जास्त वितरकांसह मोठे जाळे आहे.

कंपनीचे कर्मचारी टिकवून ठेवण्याचे प्रमाण जवळपास ९३ टक्के आहे. सध्या कंपनीची टाइल्सची उत्पादन वार्षिक क्षमता साधारण ८४.५ दशलक्ष चौरस मीटर आहे. उच्च गॅस किंमत, जाहिरात खर्च तसेच कमी झालेल्या मागणीमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला असला, तरी आगामी काळात गॅसच्या किमती कमी होण्याची कंपनी व्यवस्थापनाला अपेक्षा आहे. तसेच कंपनीने नोव्हेंबर २०२२ पासून श्रीकालहस्ती, मोरबी आणि गेलपूर येथील प्रकल्पात गॅसला पर्यायी ‘एलपीजी’ वापरण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन खर्चातील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी कंपनीने मे २०२२, तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये मुख्यतः टाइल्सच्या प्रत्येक विभागात दोन टक्के दरवाढदेखील केली.

कंपनीने दक्षिणेकडील एशियन सिरॅमिक टाइल्स प्रा. लि. या कंपनीच्या ५१ टक्के इक्विटी शेअरच्या अधिग्रहणास मान्यता दिली असून, याद्वारे दक्षिण भारतात आपले स्थान बळकट करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सध्या क्षमता वाढ, मजबूत ब्रँड, विस्तृत वितरण नेटवर्क, निरोगी ताळेबंद, उच्च क्षमता वृध्दी आणि वापर पातळी ही कंपनीची स्पर्धात्मक वैशिष्ट्ये आहेत. आगामी काळात बाजार हिस्सा वाढवून कंपनी व्यवसायवृद्धी करणे अपेक्षित आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत या कंपनीने व्यवसायवृद्धी केली आहे. दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शक्यता लक्षात घेता दीर्घावधीच्या दृष्टीने कजारिया सिरॅमिक्स लि. या कंपनीच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने काही प्रमाणात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

त्या चर्चा खऱ्या ठरल्या! अद्वैत- कलाची जोडी तुटणार; ईशा 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडणार, प्रोमो पाहून चाहते रडकुंडीला

SCROLL FOR NEXT