

Maharashtra cooperative society election schedule news
esakal
Gokul Dairy Election News : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीची स्थगिती आज उठवली. त्यामुळे गोकुळ दूध संघासह जिल्ह्यातील ‘अ’ वर्गातील तीन, ‘ब’ वर्गातील ६७, ‘क’ वर्गातील १५७ आणि ‘ड’ वर्गातील २०५ अशा एकूण सहकारातील ४३२ संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत या निवडणुका प्रलंबित आहेत. यासह ८४ दुग्ध संस्थांच्याही निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.