अर्थविश्व

दिवाळीत खास दिवशी पैसे कमवण्याची संधी, जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगची वेळ

शिल्पा गुजर

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग 2021 : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रत्येकाच्या घरात दिवाळीची लगबग सुरू आहे तशीच लगबग शेअर बाजारातही सुरू आहे. या दिवाळीत स्टॉक एक्स्चेंज 4 नोव्हेंबरला मुहूर्त ट्रेडिंगसाठी एक तासासाठी खुले राहणार आहे. बीएसई आणि एनएसई गुंतवणूकदारांना दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत स्टॉकची खरेदी-विक्री करण्याची मुभा असेल. दरवर्षी दिवाळीत एक तास मुहूर्ताचा व्यापार केला जातो. दलाल मंडळी यावेळी लक्ष्मीपूजन आणि व्यापार करतात. मुहूर्त ट्रेडिंग सत्रामध्ये सामान्य व्यापारापूर्वी ब्लॉक डील सत्र असते. यानंतर क्लोझिंगग सत्र होते. गेल्या वर्षी, बीएसई सेन्सेक्स 145 अंकांच्या वाढीसह त्यावेळच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला.तर NSE चा निफ्टी 50 12800 च्या खाली बंद झाला.

मुहूर्ताचा ट्रेडिंग कधी होणार ?
NSE च्या अधिसूचनेनुसार, ब्लॉक डील सेशन 4 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:45 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल. यानंतर संध्याकाळी 6 ते 6:08 या वेळेत प्री-ओपन सेशन होईल. सामान्य शेअर बाजार संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत खुला राहील, त्यानंतर कॉल ऑक्शन इलिक्विड सेशन आणि क्लोजिंग सेशन असेल. या दिवाळी मुहूर्ताच्या ट्रेडिंग सेशनमधील सर्व व्यवहारांचे सेटलमेंट होतील.

मुहूर्ताचा ट्रेडिंग का केली जाते ?
नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मुहूर्त ट्रेडिंगला विशेष महत्त्व आहे. गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की मुहूर्त ट्रेडिंगमुळे येत्या वर्षात संपत्ती आणि समृद्धी येते. ही प्रथा बीएसईवर 1957 मध्ये आणि एनएसईवर 1992 मध्ये सुरू झाली. अलीकडील शेअर बाजाराची स्थिती पाहता, यावेळीही सेन्सेक्स आणि निफ्टी उच्च पातळीवर व्यवहार करतील अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT