अर्थविश्व

जेट एअरवेजचे 1,000 हुन अधिक पायलट एक एप्रिलपासून संपावर

वृत्तसंस्था

मुंबई: कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जेट एअरवेजचे 1,000 हुन अधिक पायलट एक एप्रिलपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. जेटच्या पायलटचे पगार अनेक दिवसांपासून थकलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पायलटच्या संघटनेने याआधीही कंपनीला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पायलटचे थकीत वेतन देण्यात आले नाही तसेच 31 मार्चपर्यंत यातून मार्ग काढण्यात आला नाहीतर 1 एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड (एनएजी) या पायलटच्या संघटनेने मागील आठवड्यात दिला होता. 

मात्र कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या जेटच्या मॅनेजमेंटवर आता कर्ज देणाऱ्या बॅंकांचे नियंत्रण आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या गटाने आता जेट एअरवेजचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले आहे. एसबीआयकडून 29 मार्चपर्यत पतपुरवठा होण्याची अपेक्षा होती. मात्र अजूनही हा पतपुरवठा न झाल्यामुळे जेटचे व्यवस्थापन पायलटचा पगार देऊ शकलेले नाही. मुंबई आणि दिल्ली येथील पायलटनी संयुक्तपणे एक एप्रिलपासून संपावर जाण्याच निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT